दिवाळीतली पहिली पहाट उजाडली.
पणत्यांच्या रांगा, दारापुढील रांगोळी, आकाशदिवा.. घर मोठे देखणे दिसत आहे.
स्नानगंधा-उटणे-चिरांटे आदी सोपस्कारांनी अभ्यंगस्नान झालेले आहे.
बच्चेमंडळी फटाके फोडण्यात दंग झाली आहेत.
ताज्या फराळाच्या नैवेद्यही नुकताच दाखवून झाला.
आता फक्त आस्वाद घ्यायचा आहे.. लाडू,चकल्या,शंकरपाळ्यांचा, गरमागरम चहाचा आणि..
नुकत्याच प्रकाशित झालेल्या मायबोली दिवाळी अंकाचा अर्थातच.
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!
