जागतिक महिला दिन २०१० : प्रश्नावली

ही प्रश्नावली हा एक आरसा आहे, थोडंसं थांबून नीट न्याहाळुन पहा त्यातल्या छब्या. आपण आपल्या आयुष्यातील स्थित्यंतरांचा एक छोटासा आढावा घेणार आहोत. चूक/ बरोबर काहीच नाही, फक्त भूमिका समजून घेणार आहोत.

तांत्रिक अडचणी काहीशा आहेत, त्याला दुर्दैवाने आत्ता या क्षणी इलाज नाही. आम्हालाही प्रिव्ह्यु किंवा आपली उत्तरं सेव करायचे पर्याय आवडले असते. त्या समजून पुढे जाऊयात.

काही प्रश्नांना उत्तरं विस्तृत लिहीण्याची विनंती केली आहे. इच्छा आणि वेळ असल्यास जरुर आपली मतं तपशीलवार नोंदवा. अगदीच वेळ नसल्यास थोडक्यात लिहीलं तरी चालेल.

प्रश्नावलीचे उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

  • स्थळकाळादेशा पलिकडे जाऊन स्त्रीत्व या विषयावरची काही वैश्विक मतं जाणुन घेणे. मराठी/ भारतीय/परदेशी स्त्रियांची मतंभिन्नता तपासणे
  • काही क्षण थांबून, विचार करुन एक स्त्री म्हणून आपली गृहितकं, आपले महत्वाचे निर्णय आणि त्याला कारणीभूत असणारे घटक जाणीवपूर्वक तपासून पाहणे.
  • प्रश्नावलीची विषयवार व्याप्ती जरा मोठी आहे आणि तीच या प्रश्नावलीची मर्यादा आणि तेच मर्म आहे. यातील प्रत्येक विषयावर विचारण्यासारखे शेकडो प्रश्न आहेत, पण आत्ता सुरवातीला आपण सर्वच थोडेथोडे पाहूयात.
  • प्रश्नावलीला आलेल्या मतांचे व्यवस्थित संकलन करुन आपल्याला संयुक्तासाठी कशाप्रकारे मदत होईल, कुठले विषय चर्चेला घ्यावेत ते नीट पाहता येईल.

तुझ्यासारख्या अनेक जणीच्या संवादातून. स्वःताची, नातेवाईक, परिचीत स्त्रियांची, देशीविदेशी मैत्रिणींची प्रामाणिक मतं आम्हाला इथे भरून पाठव.

प्रश्नावली भरण्याची शेवटची तारीख आहे ५ मार्च, २०१०.