लावणी

लाविला तुरा फेट्यासी

लाविला तुरा फेट्यासी
युवराज तुम्ही मी हो दासी

बसताच उद्या मंचकी
विसाराल जुन्या ओळखी
विसर तो स्नेह सुखवासी, हो हो

महालात जिगाचे पडदे
भोवती शिपाई प्यादे
कोठली वाट दीनासी .१

मज हवी भेट राजांची
बाई तू कोण कुणाची
क्षण नसे वेळ आम्हासी

हे हास्य मोकळे असले
मी प्रथम जयाला फसले
दिसणे न पुन्हा नजरेसी ..२

येईल नवी युवराणी
अति नाजुक कमळावाणी
पुसणार कोण चाफ्यासी

लाडके तुझ्यावाचोनी
मज आवडतेना कुणी
पहिलीच भेट रमणीसी ...३

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कुणी तरी बोलवा दाजिबाला

मी तर जाते जत्रंला, गाडीचा खोंड बिथरला
बळ नाही घरच्या गणोबाला, कुणी तरी बोलवा दाजिबाला

दाजिबासारखा दीर दुनियेमध्ये नाही
गोर्‍या भावजेची त्यांना लई अपूर्वाई
त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई
हेंदट आमच्या नशिबाला, कुणी तरी बोलवा दाजिबाला

दाजिबांचा स्वभाव लई गुलहौशी
सजवतील घोडा सांगितल्यासरशी
मला पुढं घेतील हसून चटदिशी
निघता निघता उशीर झाला, कुणी तरी बोलवा दाजिबाला

दाजिबा म्होरं घोड्यावर बसल्याबसल्या
अंगाला अंग लागतं अन्‌ होती गुदगुल्या
बाळपणीच्या येती आठवणी फार मागल्या
मी लई भुलते रुबाबाला, कुणी तरी बोलवा दाजिबाला

साजशिणगार केला ल्याले साखळ्या तोडे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

श्रावणाचं ऊन मला झेपेना

भरलं आभाळ पावसाळी पाहुणा गं
बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना

पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना

निळ्या डोळ्यावरी मेघुटांच्यापरी
वाट पाहिली डोळ्या चळ थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना

श्रावणाच्या सरी पानभर थरथरी
हिरव्या मोराची थुईथुई थांबेना
निळ्या मोराची थुईथुई थांबेना
पिवळ्या पंखाचा पक्षी नाव सांगेना
बाई श्रावणाचं ऊन मला झेपेना

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

औंदा लगीन करायचं

दाटु लागली उरात चोळी, कुठवर आता जपायचं
औंदा लगीन करायचं, बाई, औंदा लगीन करायचं ॥ ध्रू ॥

रस्त्यानं जाताना बघत्यात किती, गालातल्या गालात हसत्यात किती
पदर सारखा ढळतोय गं, किती तयाला आवरायचं ॥ १ ॥

मनांत ठसतोय कुणी तरी, उरांत होतय कसंतरी
झोप रातिला येइना मुळी, सपनात कुणीतरी बघायचं ॥ २ ॥

धक्का मारत्यात रस्त्यामधी, खळखळ होतिया मनामधी
मनासारखा हवा गडी, कुठवर बाई थांबायचं ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

रातिची झोप मज येईना

रातिची झोप मज येईना, कि दिस जाईना
जा जा जा, कुणितरी सांगा हो सजणा ॥ ध्रु ॥

लागली श्रावणझड दारी, जिवाला वाटे जडभारी
अशी मी राघुविण मैना, की झाली दैना ॥ १ ॥

एकली झुरते मी बाई, सुकली गं पाण्याविण जाई
वाटते पाहु मनमोहना, की मन राहिना ॥ २ ॥

कठिण किति काळिज पुरुषाचे, दिवस मज जाती वर्षाचे
जाऊनी झाला एक महिना, की सखा येइना ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अत्तराचा फाया

अत्तराचा फ़ाया तुम्ही, मला आणा राया ॥ ध्रु ॥

विरहाचे ऊन बाई
देह तापवून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी, चंदनाची छाया ॥ १ ॥

नाही आग, नाही धग
परी होई तगमग
विस्तवाशिवाय पेटे, कापराची काया ॥ २ ॥

सुगंधाने झाले धुंद
जीव झाला ग बेबंद
देहभान मी विसरावे, अशी करा माया ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

चिंचा आल्यात पाडाला

चिंचा आल्यात पाडाला
हात नको लावूस झाडाला
माझ्या झाडाला

माझ्या कवाच आलय ध्यानी
तुझ्या तोंडाला सुटलय पाणी
काय बघतोस राहुन आडाला

मी झाडाची राखणवाली
फिरविते नजर वर खाली
फळ आंबुस येईल गोडाला

माझ्या नजरेत गोफणखडा
पुढं पुढं येसी मुर्दाडा
काय म्हणूं तूझ्या येडाला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

छबीदार सुरत साजिरी

छबीदार सुरत साजिरी, दिसे गोजिरी
बरी आवडलीस माझ्या मना

घडी घडी अरे मनमोहना
हसुनी गुणीजना देखता नको रे बोलू मशी

बरी आवडलीस माझ्या मना
पहा पुरती चौकशी
लाधली
मनी तू ठसलीस आमुच्या गडे
नीज ध्यास सदा अंतरी फिदा तुजवरी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे

तुझ्या प्रीतीचे दुःख मला दावू नको रे
वधूनी जाई प्राण घेई (जगी) ठेवू नको रे

याचे ममतेचा लोभ मला कळ्ळा आता
कोण्या ठिकाणी आहे जाऊन लावा पता
तिथे चालत जाईन आप अंगे स्वतः
जाऊन सांगा की रानभरी (?) होऊ नको रे
वधूनी जाई प्राण घेई ठेवू नको रे
तुझ्या प्रितीचे...

जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी
होऽऽऽऽ
(जगी सांगतात प्रीत पतंगाची खरी
झडप घेऊन देतो प्राण दीपकाचे वरी -२)
हे मी सांगत असताना का गे पडले भरी
रत्न टाकून पदरात गार घेऊ नको रे
वधूनी जाई प्राण घेई ठेवू नको रे
तुझ्या प्रीतीचे...

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: