रंग उमलल्या मनाचे

रंग उमलल्या मनांचे

कॅटवॉक साजिरा
सचिन रमेश तेंडुलकर! केदार
अनिकेत;अश्वत्थ रैना
कृष्णविवर टण्या
अनंत अमुची ध्येयासक्ती चिनूक्स
- श्री. अजित जोशी
- वीणा जामकर
लेखन प्रकार: 

अनंत अमुची ध्येयासक्ती

आपल्याला नक्की काय करायचं आहे, हे या तरुणांना पक्कं ठाऊक होतं. हवं ते मिळवण्यासाठी त्यांनी मेहनत घेतली, कष्ट केले, आणि निवडलेल्या क्षेत्रात यश मिळवलं. पालकांनीही त्यांना साथ दिली. प्रामाणिकपणे काम करून, विचारांशी ठाम राहून हवं ते साध्य करता येतं, आणि त्याचा देशाला, समाजाला फायदाच होतो हे या तरुणांनी सिद्ध केलं आहे.

border2.JPG

आपल्या आयुष्याचं ध्येय काय आहे याचा शोध घेणं, हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असावं. - गौतम बुद्ध
लेखन प्रकार: 

यशोदा वाकणकर

यशोदा वाकणकर ही डॉ. अनिल अवचट व डॉ. सुनंदा अवचट यांची धाकटी मुलगी. शाळेत असताना एपिलेप्सी या व्याधीमुळे यशोदाचं आयुष्यच बदललं. काही वर्षांपूर्वी एका यशस्वी शस्त्रक्रियेनंतर यशोदा व्याधीमुक्त झाली. अशीच व्याधी असलेल्या अन्य लोकांसाठी काहीतरी उपक्रम हाती घ्यावा असं तिला वाटलं, आणि त्यातूनच एपिलेप्सीच्या रुग्णांना हरप्रकारे मदत करणार्‍या 'संवेदना फाऊंडेशन'ची स्थापना झाली. आज भारतभरातील एपिलेप्सीच्या रुग्णांसाठी 'संवेदना' हा एक फार मोठा आधार आहे.

border2.JPG
लेखन प्रकार: 

श्री. अजित जोशी

प्रशासकीय यंत्रणा आणि संवेदनशीलता यांचा काडीचा संबंध नाही, असा सर्वसाधारण समज प्रचलित आहे. या समजाला थेट छेद देण्याचं फार महत्त्वाचं काम श्री. अजित जोशी यांनी केलं आहे. श्री. जोशी हे हरयाणा कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. २००३ साली ते यूपीएससीच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आणि देशात २९व्या क्रमांकानं उत्तीर्ण झाले. जेमतेम सहा वर्षांच्या काळात श्री. अजित जोशी यांनी अनेक लोकोपयोगी योजना राबवून प्रबळ इच्छाशक्ती व समाजाभिमुख दृष्टिकोनाच्या जोरावर किती मोठं काम उभं करता येतं, हे दाखवून दिलं आहे.

लेखन प्रकार: 

वीणा जामकर

'वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', 'जन्म', 'लालबाग परळ' असे चित्रपट असोत, किंवा 'चार दिवस प्रेमाचे', 'एक रिकामी बाजू', 'दलपतसिंग येता गावा' यांसारखी नाटकं, वीणा जामकर या तरुण अभिनेत्रीचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्तीमुळे वीणाने एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. तिची भूमिका असलेले अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत गाजले आहेत. 'पलतडचो मुनिस' हा तिची प्रमुख भूमिका असलेला कोंकणी चित्रपट यंदा बर्लिन चित्रपट महोत्सवात नावाजला गेला.

लेखन प्रकार: 

श्री. मोहित टाकळकर

'छोट्याशा सुट्टीत', 'फ्रिजमध्ये ठेवलेलं प्रेम', बेड के नीचे रहनेवाली', 'तू', 'चारशे कोटी विसरभोळे', 'गार्बो', 'नाणेफेक', 'मात्र रात्र', 'काश्मीर काश्मीर' अशा दर्जेदार नाटकांमुळे मोहित टाकळकर म्हणजेच सकस नाट्यानुभव, हे समीकरण आता रूढ झालं आहे. एक प्रयोगशील दिग्दर्शक म्हणून त्याने ओळख तयार केली आहे. 'आसक्त' या संस्थेद्वारे त्याने उत्तम नाटकं व कलाकार रसिकांसमोर आणले आहेत. महाराष्ट्रातील नाट्यचळवळीला एक वेगळी दिशा देण्यात मोहितचा फार मोठा वाटा आहे. मोहितच्या नाटकांमुळे उत्तम प्रेक्षक तयार होणं, ही एक अतिशय महत्त्वाची घटना आहे.

लेखन प्रकार: 

कॅटवॉक

'जन्माचे साध्य वगैरे काहीही बोलू नकोस. असलं काहीही नसतं. आपण चालत राहायचं. डौलाने, ऐटीत. फॅशन शोमध्ये चालल्यागत. आकांतांचे आणि आवेगांचेही थांबे असतात. ते मांजराच्या पावलाने येतात. पण प्रचंड होऊन येतात. त्यांचाही स्वतःचा एक डौल, ऐट, रुबाब आणि वेग असतोच. आपणही तितक्याच ऐटीत त्यांना झेलायचे, पार पाडायचे. ते करताना स्वतःला निरखत राहायचं. वन्स-इन-अ-लाईफ असा तो अनुभव असतो. तो भोगायचा-जगायचा..!!'

border2.JPG

२२ जुलै

हो

लेखन प्रकार: 

अनिकेत; अश्वत्थ

......वडलांच्या अंगणातले नीलगिरीचे अजस्र झाड आणि असंख्य चांदराती. झाड चंद्रप्रकाशात किंचित भेसूर दिसायचं, सोसाट्याच्या वार्‍यात अक्षरशः चवर्‍या ढाळल्यासारखे वाकून, लवून जायचं. चंद्र मुजोर. चंद्रप्रकाश इतका की, चेहरे वाचता यावेत. रात्रीच्या उष्ण वार्‍याच्या झोतांचा जोर इतका की, महाकाय नीलगिरीच काय चंद्रालाही फराट्याने उडवून लावेल. अशा रात्री कल्लोळ घेऊनच यायच्या. डोक्याचा भुगा! चंद्रप्रकाशाने एखाद्याला वेड लागावं आणि नीलगिरीनं वाकून खिजवावं. पानांची सळसळ मांत्रिकाच्या हातातल्या झाडूसारखी सपासप. कधी चंद्रप्रकाशानं तलखी होणं ऐकलंय? पण व्हायची. अंगाची काहिली, डोक्याचीही.

लेखन प्रकार: 

तेजस्विनी सावंत

तेजस्विनी सावंत या महिला नेमबाजाने जागतिक नेमबाजी स्पर्धेत विश्वविक्रमाची नोंद करत सुवर्णपदक पटकावलं, आणि भारताची मान अभिमानानं उंचावली. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. या आधीही अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने लक्षवेधी कामगिरी करून भारतीय नेमबाजीची जगाला दखल घ्यायला लावली होती. प्रशिक्षणाचा व नेमबाजीसारख्या महागड्या खेळासाठी आवश्यक असणार्‍या आर्थिक पाठबळाचा अभाव, यांवर मात करत तेजस्विनीनं जे यश मिळवलं आहे, ते खरोखर अद्भुत आहे. तेजस्विनी सावंत या सुवर्णकन्येची ही तेजस्वी यशोगाथा...

लेखन प्रकार: 

डॉ. अनिकेत सुळे

डॉ. अनिकेत सुळे मुंबईच्या होमी भाभा विज्ञान केंद्रात कार्यरत आहे. विज्ञानचळवळीचा प्रसार हे या केंद्राचं उद्दिष्ट आहे. दरवर्षी आयोजित होणार्‍या विज्ञान विषयांच्या ऑलिंपियाड स्पर्धांची तयारीही या केंद्रात करून घेतली जाते. खगोलशास्त्र व खगोलभौतिकी ऑलिंपियाड स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून अनिकेत काम करतो. अनिकेतच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी गेली काही वर्षं अनेक पदकांची कमाई करून पदकतालिकेत भारताला प्रथमस्थान मिळवून दिलं आहे.

लेखन प्रकार: