महिला दिन २०१३
८ मार्च २०१३ ... आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्याचे संयुक्ताचे हे चौथे वर्ष! स्त्रीबाबत समाजाच्या मानसिकतेचा विकास होणे ही फक्त काळाची गरज राहिली नसून स्त्री-स्वास्थ्याचा व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यामुळे प्रत्येकाची गरज झाली आहे. त्याच दिशेने मार्गक्रमणा करताना, वाटेतल्या अडसरांना ओलांडून पुढे जात असताना जे प्रश्न आपल्या मानसिकतेचा व वर्तनाचा पुनश्च विचार करायला लावतात अशा प्रश्नांचा वेध घेण्याचा व त्यांवर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या वर्षीच्या महिला दिन उपक्रमात केला आहे.
'प्रदीप लोखंडे, पुणे-१३' - श्री. सुमेध वडावाला (रिसबूड)
प्रदीप लोखंडे यांनी मोठ्या कष्टपूर्वक जमवलेल्या ग्रामीण भारताच्या डेटाबेसचा वापर करून प्रचंड मोठा व्यवसाय तर उभारलाच, पण या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी सतत दुर्लक्षित राहिलेल्या हजारो ग्रामीण तरुणांना रोजगारही मिळवून दिला. श्री. प्रदीप लोखंडे यांचा संपूर्ण जीवनप्रवास श्री. सुमेध वडावाला (रिसबूड) यांनी 'प्रदीप लोखंडे, पुणे-१३' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. या पुस्तकातील ही काही पानं...
विश्वकरंडक मायबोली विशेषांक
क्रिकेट विश्वकरंडक २०११ भारताने जिंकला. त्यानिमित्ताने क्रिकेटप्रेमी मायबोलीकरांनी संपादीत केलेला "विश्वकरंडक मायबोली विशेषांक" वाचा.
तेंडुलकर स्मृतिदिन लेखमाला - समारोप
८२ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
या संमेलनातील निवडक कार्यक्रमांची ध्वनिमुद्रणे इथे आपल्याला ऐकता येतील. महाबळेश्वर येथे पार पडलेल्या ८२व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या वेळी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्री. कौतिकराव ठाले-पाटील यांनी केलेले भाषण खास आपल्यासाठी..
मातृदिन २०१३
'मातृदिन' किंवा 'मदर्स डे' म्हणजे अलिकडच्या पिढीचा आईसाठी असलेला खास दिवस! मातृत्त्वाचा गौरव करणारा जागतिक सणच जणू! "आई" ही संकल्पना थोडी विस्तृत करून केवळ जन्मदात्या आईलाच केंद्रस्थानी न ठेवता, आजच्या युगातील मातेच्या धावपळीच्या जीवनात मुलांच्या संगोपनात साथ देणारे,जन्मदात्या आईच्या गैरहजेरीत "आईच्या" ममतेने, वात्सल्याने तिच्या बाळांची काळजी घेणारे आजी- आजोबा, केअरटेकर्स, पाळणाघरे यांनाही या उपक्रमात सामील करत आहोत.
मराठी गझल कार्यशाळा -२
आमच्यासाठी गेला महिनाभर खूप आनंदात, एक प्रकारच्या भारलेल्या मनःस्थितीत गेला. आधी म्हटल्याप्रमाणे जर ते 'वेड' आम्ही तुम्हालाही लावू शकलो असू, तर तेच कार्यशाळेचं यश.
'उत्तम गज़ल लिहिता येणं' हे साध्य खरंच, पण ती लिहिताना आणि वाचतानाही तिचा सर्वांगीण आस्वाद घेता आला, तर तो प्रवास त्या मंज़िलइतकाच, नव्हे त्याहूनही सुंदर होतो. या आनंदयात्रेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!