पहिल्या सरी
हर्ष माझिया उरी
उधळत गेल्या उधळत गेल्या ||धृ||
पर्ण-कुसुमांवरी
गिरी-शिखरांवरी
बरसती या सरींवर सरी
नवचैतन्य फुलवत गेल्या ||१||
खळाळले शुभ्र झरे
शृंगारले मोरपिसारे
वेडावले हे रान साजरे
नेत्रकळ्या उमलवत गेल्या ||२||
झाकाळले मन बावरे
उजळले क्षण ते लाजरे
दाटले हे नयन टपोरे
हृदयी प्रेमधनू सजवत गेल्या ||३||
-शितु
प्रतिसाद
अहाहा! फारचं सुंदर.
अहाहा! फारचं सुंदर.
नादमय
नादमय :)
मस्त! शैलजाताई, सुंदर चित्र!
मस्त!
शैलजाताई, सुंदर चित्र!
चित्र जास्त आवडले
चित्र जास्त आवडले :)