तृषा

trushna_f.jpg

नकळत विस्तृत होत जातो आपण
एखाद्या समुद्रासारखं...
मुक्त दिसत असलो तरी
जोखडात असतो
सगळ्या तटांच्या
आपसूक जोडल्या गेलेल्या नद्या
कधी आनंदाचे प्रवाह आणतात
किंवा अडून बसतात
कुणी त्रयस्थाने बांधलेल्या
बंधार्‍यात...

नेमाने होणार्‍या भरती-ओहोटीत
निमूट बघतो स्वत्वाला गोठताना
वरवर फेसाळणार्‍या लाटांचा चेहरा
लपवत राहतो तळातील गूढ हालचाली...
माणसे मात्र लाटांनाच भेटतात

कधी जवळून, कधी दुरून
व्रतस्थ किनार्‍यांसारखे...
अखेर निराश परततात लाटा
शिलकीत उरलेले शंख-शिंपले
मनाच्या वाळूत पेरीत ...

आणि वाटत राहतं सागराला
आतून आतून
कधीतरी ...कुणाच्यातरी...
तृष्णेचा घोट व्हावं.

-शाम

प्रतिसाद

मनाचा तळ गाठणारी रचना!

>>>आणि वाटत राहतं सागराला
आतून आतून
कधीतरी ...कुणाच्यातरी...
तृष्णेचा घोट व्हावं. <<< वा ! सुरेख !

शेवटचं कडवं अतिशय सुरेख.

अखेर निराश परततात लाटा
शिलकीत उरलेले शंख-शिंपले
मनाच्या वाळूत पेरीत ...

अहा..........मस्तच !!

फार सुरेख! आर्त....

माणसे फक्त लाटांनाच भेटतात>>खरंय!!

समुद्रासारखीच खोल कविता..खूप छान लिहिलेत शाम.

तृष्णेचा घोट व्हावं.-- सही!

माणसे मात्र लाटांनाच भेटतात....

तरल,गहिरे काव्य!

जयन्ता५२

..

वाह!
अगदी अगदी!

खुप छान

शेवटच्या ओळी फार आवडल्या..

खुपच छान.......
वरवर फेसाळणार्‍या लाटांचा चेहरा
लपवत राहतो तळातील गूढ हालचाली...
माणसे मात्र लाटांनाच भेटतात

नेमाने होणार्‍या भरती-ओहोटीत
निमूट बघतो स्वत्वाला गोठताना
वरवर फेसाळणार्‍या लाटांचा चेहरा
लपवत राहतो तळातील गूढ हालचाली...
माणसे मात्र लाटांनाच भेटतात>>>>>> जबरदस्त!
शेवटचं कडवंही खासच! कविता आवडली.

शाम सर...सुंदर कविता

सुंदर !! :)