दिलासा

दिलासा

तुझ्यापासून... तुझ्यापर्यंतचा
माझा प्रवास
मला घेऊन येतो
माझ्यापासून... माझ्यापर्यंत.

शक्यतांच्या अनेक किनार्‍यांना
नुसताच स्पर्श करून
परत येताना जाणवतं,
भिजलेलं असतं मन,
भिजलेला असतो देह
आणि अवघा जन्मच...

अकार, मकारापासून
निर्विकारापर्यंत जाताना
तू आहेस ... असतोस
माझ्यासाठी ... माझा ...
हा दिलासा व्यापून उरतो
अवघ्या असण्याला

आणि नसण्यालाही ...

-बयो

प्रतिसाद

छान! पहिले कडवे फार सुंदर जमले आहे.

संपूर्ण कविताच सुरेख आणि आशयबद्ध.

सुरेख उतरलीये कविता :)

खूपच आवडली!

'आणि नसण्यालाही' - ये ब्बात! :)