तुडवीत वाट जातो, ती रोजचीच आम्ही
हे सिद्ध रोज करतो, लायक जिण्यास आम्ही
तो मुक्त वाहणारा, वेढे नभास वारा
भूतला व्यापून उरलो कोरडे नि:श्वास आम्ही
छंद नाही पोसले की धुंद नाही जाहलो
कंठण्या निस्तेज जीवा ओतले सायास आम्ही
खेद ना आम्हा कशाचा, रोष ना कोणाप्रती
ना छेडण्यास धजलो, कधीही कुणास आम्ही
मुखवटे लेवून हसरे, नित्य सारे नेम पाळू
धन्य चाकोरीस मानू, नेणिवेचे दास आम्ही
रणशिंग फुंकलेले, संघर्ष-घोष घुमतो
क्रांती जरी समोरी, मृतवत उदास आम्ही
- श्रीराम बर्वे
प्रतिसाद
'सायास' आणि 'उदास' हे सर्वात
'सायास' आणि 'उदास' हे सर्वात विशेष वाटले.