दोन सुखाच्या घासांवरही भागत असते
कुठे जिंदगी इतके सारे मागत असते
ऊर फुटावा इतके धावत असतो कोणी
जगण्यासाठी कुठे एवढे लागत असते
तुला द्यायचा आहे तर दे स्वर्ग असा की
गरिबीचेही जेथे हसून स्वागत असते
इतकी येते याद कुणाला माहेराची
लागे चटका किंवा भाकर डागत असते
फक्त एवढ्यासाठी जातो घरी परतुनी
उंबरठ्याशी एक निरांजन जागत असते
वेगवान जगण्याच्या या धुंदीत विसरलो
मृत्यूचेही येथे स्टेशन लागत असते
माणूसच दरवेळी चुकतो असेच नाही
परिस्थितीही कधीकधी चकव्यागत असते
'शाम' बदलल्या इथल्या माणुसकीच्या व्याख्या
दुनिया हल्ली पैसा बघून वागत असते
- शाम
प्रतिसाद
उंबरठ्याशी एक निरांजन जागत
उंबरठ्याशी एक निरांजन जागत असते>> सुरेख!
आवडली!
फक्त एवढ्यासाठी जातो घरी
फक्त एवढ्यासाठी जातो घरी परतुनी
उंबरठ्याशी एक निरांजन जागत असते <<व्वा ! व्वा !
"उर फुटावा इतके धावत असतो
"उर फुटावा इतके धावत असतो कोणी
जगण्यासाठी कुठे एवढे लागत असते"
"माणूसच दरवेळी चुकतो असेच नाही
परिस्थितीही कधीकधी चकव्यागत असते" >>>> हे दोन सर्वात विशेष वाटले.
पहिल्या शेरात 'ऊर' असे हवे आहे का ?
>>वेगवान जगण्याच्या या धुंदीत
>>वेगवान जगण्याच्या या धुंदीत विसरलो
मृत्यूचेही येथे स्टेशन लागत असते <<
सगळेच शेर कमालीचे सुंदर आहेत..
सुंदर गझल.. ही अशी तुझी जरा
सुंदर गझल..
ही अशी तुझी जरा वेगळी भाषा आणि वेगळे विचार हे तुझ्या लिखाणाची जान आहे.
>> वेगवान जगण्याच्या या
>> वेगवान जगण्याच्या या धुंदीत विसरलो
मृत्यूचेही येथे स्टेशन लागत असते>>
मस्त!
अप्रतिम गजल. ही अशी तुझी जरा
अप्रतिम गजल.
ही अशी तुझी जरा वेगळी भाषा आणि वेगळे विचार हे तुझ्या लिखाणाची जान आहे. >> +१०
सगळे शेर आवडलेत मस्तच गझल
सगळे शेर आवडलेत
मस्तच गझल
होय उकाका, तो ऊर असाच हवा
होय उकाका, तो ऊर असाच हवा आहे...
उर -> ऊर असा बदल केला आहे.
उर -> ऊर असा बदल केला आहे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.
शाम, गझल आवडली.
शाम, गझल आवडली.
श्यामलीला १००० मोदक (आणि वर
श्यामलीला १००० मोदक (आणि वर तुपाची धार) :)
अख्खी गझल आवडली. त्यातही...
ऊर फुटावा इतके धावत असतो कोणी
जगण्यासाठी कुठे एवढे लागत असते
फक्त एवढ्यासाठी जातो घरी परतुनी
उंबरठ्याशी एक निरांजन जागत असते
माणूसच दरवेळी चुकतो असेच नाही
परिस्थितीही कधीकधी चकव्यागत असते
हे तीन खासम खास.
सुंदर गझल..
सुंदर गझल..
सुरेख ! मस्त लिहितात तुम्ही.
सुरेख ! मस्त लिहितात तुम्ही. श्यामलीला अनुमोदन.
वा मस्तच, सगळेच शेर
वा मस्तच, सगळेच शेर मस्त...
सुधीर
श्याम, गझल आवडली
श्याम, गझल आवडली
सगळ्या प्रतिसादक आणि वाचकांचे
सगळ्या प्रतिसादक आणि वाचकांचे खूप खूप आभार.
>> ऊर फुटावा इतके धावत असतो
>> ऊर फुटावा इतके धावत असतो कोणी
जगण्यासाठी कुठे एवढे लागत असते
वा! खूप खूप मस्त