आज तुम्ही सारे नाहीत
मन विषण्ण...
याच स्वार्थी माणसाच्या बेगडी आयुष्यामुळेच
उद्ध्वस्त झाले तुमचे जीवन
काय दिमाखाने सजवल्या होत्या त्या वाटा दुतर्फा,
ज्या वाटेवरी माझ्यापरीच खूप जणांनी
तुमचं रूप न्याहाळलंय...
तुम्हांस पाहता, तिरंग्याच्या हिरव्या रंगाचा गर्व वाटायचा
या घडीला या मानवरूपी असुराच्या मतीची लाज वाटतेय..
ती हिरवाई, तो परांचा किलबिलाट
ती शीतल छाया, तो मधुर गर
असं किती किती...खूप...
आता मात्र शून्य, फक्त शून्य...
आता, त्या वाटेवरून जाणे नरकाप्रमाणे भासते
पण मन वेडे तुमच्या स्मृतींमुळे
तिकडेच सैरभैरत सुटते
एक एक फांदी तुटताना मी पाहिल्यात तुमच्या वेदना
आज वचन देते तुम्हांस - पुढे प्रयत्न करीन की,
नाही सोसाव्या लागणार तुमच्या सवंगड्यांना त्याच असह्य वेदना!
- श्रुती शिंदे कचरे (शितु)
प्रतिसाद
Ya kavitecha ani 'vedh
Ya kavitecha ani 'vedh bhavishyacha' yancha ekmekanshi kaay sambandh?
अहो मामी ही कविता वृक्षतोडीवर
अहो मामी ही कविता वृक्षतोडीवर आहे ,या वृक्षतोडीमुले भविष्यात प्रत्येक सुजाण नागरिकाच्या ओठांवर हे शब्द असतील,या अर्थाने लिहिलेय,...