संवाद

सृ

जनशीलतेचा ध्यास घेऊन चाकोरीबाहेरच्या वाटेवर अखंड, अविरत वाटचाल करणारी आपल्यातलीच, पण तरीही आपल्या विचारांनी, आचारांनी, कलागुणांनी नावारूपाला येऊन असामान्यत्व प्राप्त झालेली माणसं. त्यांची विचारप्रक्रिया, अभिव्यक्ती आणि जगण्याचा दृष्टीकोन याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी मारलेल्या मनमोकळ्या गप्पांतून साधलेला हा संवाद!