तुझ्या पावलांचेच ठसे

पारिजात तू दरवळणारा
अंगणात अव्यक्तपणे
निरलस हसरा सडा सांडशी
रोज किती आश्वस्तपणे
जितके तू उधळून दिले ते
मला न वेचाया जमले
तरुण व्यथांच्या करुण फुलांना
मी माझ्या नयनी टिपले

रोम रोम फुलतो, बागडतो,
तुझा स्पर्श मज आठवतो
रसरशीत नवतारुण्याचा
बहर मनाला धुंदवतो
अवचित चाहुल तुझी जाणवे
आतुरता दाटे नयनी
हव्याहव्याश्या बेचैनीची
चंचल मी व्याकुळ हरिणी

2013_HDA_paaulkhuna.JPG

झुळझुळणाऱ्या वाऱ्यामधुनी
जाणवतो रे श्वास तुझा
उधाणलेल्या देहवसंती
मिरवत मी मधुमास तुझा
किती शोधते कुठे विसरले
धडधडणारे हृदय कसे
सर्वदूर माझ्या भवताली
तुझ्या पावलांचेच ठसे

- (रसप) रणजित पराडकर

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

सहजसुंदर !!

:)

व्वा ! छान.

"तरुण व्यथांच्या करुण फुलांना
मी माझ्या नयनी टिपले " >>> या ओळी सर्वात विशेष.

मस्त.

Jhakaas !

हमखास आवडणारी रसप शैली .

आवडली कविता

आवडली कविता

jhakkas :)

वाह, सुंदरच ....

मस्त