ग्रंथस्नेह

मनोगत
bookshelf.jpg
वाचकहो,संकल्पनाधारित अंकाची कल्पना जाहीर झाल्यावर लेखकांकडून काही प्रश्न येऊ लागले. नक्की कशा प्रकारचे साहित्य अपेक्षित आहे, अशी विचारणा होऊ लागली आणि ती उत्तरे शोधता शोधता सहज म्हणून संपादकमंडळातर्फे या छोट्याश्या दिवाळी भेटीची, म्हणजेच 'ग्रंथस्नेह'ची कल्पना सुचली.

अंकातल्या सर्व संकल्पना किती सर्वसमावेशक आहेत, त्याचे उदाहरण म्हणून अक्षरवाङ्‌मयजगतातला हा एक छोटासा फेरफटका. ही पुस्तके आपली वैचारिक आणि भावनिक साथसोबत करतील, अशी आशा आहे. ही यादी सर्वसमावेशक नाही, याची आम्हांला नम्र आणि यथोचित जाणीव आहे.

कशी वाटली ही भेट?
कळवायला विसरू नका !
(वाचनेच्छुकांना पुस्तके शोधायला मदत व्हावी या हेतूने जास्तीत जास्त पुस्तकांचे ढोबळमानाने
वर्गीकरण /प्रकाशन इत्यादी तपशील सोबत दिलेले आहेत.)

***

निसर्गायण

(पर्यावरण/ माहिती संकलन/ दस्तऐवजीकरण)

१. ग्लोबल वार्मिंग : अभिजित घोरपडे (राजहंस प्रकाशन)
२. कहाणी मानवप्राण्याची : नंदा खरे (मनोविकास प्रकाशन)
३. माणूस आणि झाड : निळू दामले (राजहंस प्रकाशन)
४. बखर पर्यावरणाची (आणि विवेकी पर्यावरणवाद्यांची) : अतुल देऊळगावकर (मौज प्रकाशन गृह)
५. उर्जेच्या शोधात : प्रियदर्शनी कर्वे (राजहंस प्रकाशन)
६. गोईण : राणी बंग (ग्रंथाली)
७. आव्हान निसर्गाचे : मिलींद आमडेकर (लोकवाङ्‌मय गृह )
८. निसर्गायण : दिलीप कुलकर्णी (राजहंस प्रकाशन)

(ललित साहित्य)

९. वृक्षगान : शरदिनी डहाणूकर (श्रीविद्या प्रकाशन)
१०.ऋतुचक्र : दुर्गा भागवत (पॉप्युलर प्रकाशन)
११. नेगल १-२ : विलास मनोहर (ग्रंथाली)
१२. चकवाचांदण (एक वनोपनिषद) : मारुती चितमपल्ली (मौज प्रकाशन गृह)
१३. आसमंत : श्रीकांत इंगळहळीकर (करोला पब्लिकेशन)
१४. बरेच काही उगवून आलेले... : द.भा. धामणस्कर (मौज प्रकाशन गृह)
१५. निसर्गवाचन : मारुती चितमपल्ली (पद्मगंधा प्रकाशन)
१६. रानवाटा : मारूती चितमपल्ली (साहित्य प्रसार केंद्र)
१७. अरण्यवाचन : अतुल धामणकर (श्रीविद्या प्रकाशन)
१८. सृष्टीत गोष्टीत : अनिल अवचट (मॅजेस्टिक प्रकाशन)
१९. वनात जनांत : अनिल अवचट (मॅजेस्टिक प्रकाशन)
२०. पक्ष्यांचे लक्ष थवे : ना. धों. महानोर (पॉप्युलर प्रकाशन)

कला आणि जाणिवा

(समीक्षा/ सौंदर्यशास्त्र)

१. सौंदर्य आणि साहित्य : बा. सी. मर्ढेकर (मौज प्रकाशन गृह)
२. सौंदर्यानुभव : प्रभाकर पाध्ये (मौज प्रकाशन गृह)
३. तरीहि येतो वास फुलांना! : म. वा. धोंड (राजहंस प्रकाशन)
४. साहित्याची भाषा : भालचंद्र नेमाडे (साकेत प्रकाशन)
५. जास्वंद : माधव आचवल (मौज प्रकाशन)
६. आस्वाद आणि आक्षेप : दुर्गा भागवत (डिंपल प्रकाशन)
७. लोकसाहित्य : शोध आणि समीक्षा : रा.चिं.ढेरे (पद्मगंधा प्रकाशन)

(आस्वाद/साहित्यिक पत्रव्यवहार)

८. बहुपेडी विंदा १ आणि २ : विजया राजाध्यक्ष (मौज प्रकाशन गृह)
९. वाचू आनंदे भाग १-४ : संपादन- माधुरी पुरंदरे, नंदिता वागळे (ज्योत्स्ना प्रकाशन)
१०. किमया : माधव आचवल (मौज प्रकाशन गृह)
११. लिहावे नेटके : माधुरी पुरंदरे (ज्योत्स्ना प्रकाशन)
१२. अष्टदर्शने : विंदा करंदीकर (पॉप्युलर प्रकाशन )
१३. रिल्केची दहा पत्रे : अनिल कुसूरकर
१४. पश्चिमप्रभा : महेश एलकुंचवार (विजय प्रकाशन)
१५. कलात्म : संजय आवटे (माइंड अ‍ॅन्ड मीडिया)
१६. जी एंची निवडक पत्रे (खंड १-४) : संपादक - म.द.हातकणंगलेकर, सु.रा.चुनेकर, श्री.पु.भागवत (मौज प्रकाशन गृह)
१७. वाटा आणि मुक्काम : मिलिंद बोकील, सानिया, भारत सासणे, आशा बगे (मौज प्रकाशन गृह)
१८. शतकाच्या सुवर्णमुद्रा. महाराष्ट्र कवी परंपरा : एक ओझरते दर्शन : वसंत बापट (साधना प्रकाशन)
१९. कविता : विसाव्या शतकाची: संपादक - शांता ज. शेळके, प्र. ना. परांजपे, वसंत आबाजी डहाके, नीलिमा गुंडी (उत्कर्ष प्रकाशन)

(दृश्यकला/ललितकला/वास्तुकला)

२०. माझी छायाचित्रकला : देविदास बागुल (अभिजित साहित्य)
२१. स्टुडिओ : सुभाष अवचट (पॉप्युलर प्रकाशन)
२२. पिकासो : माधुरी पुरंदरे (पुरंदरे प्रकाशन)
२३. लहजा : रोहिणी भाटे (मौज प्रकाशन गृह)
२४. कोरा कॅनव्हास : प्रभाकर बरवे (मौज प्रकाशन गृह)
२५. रापण : प्रल्हाद अनंत धोंड (मौज प्रकाशन गृह)
२६. निवडक चिन्ह पर्व पहिले : सतीश नाईक (चिन्ह प्रकाशन)
२७. कलेपासून कलेकडे : प्रभाकर कोलते (बोधना प्रकाशन)
२८. झरोका : नरेन्द्र डेंगळे (ब्रेन टॉनिक)

(आत्मवृत्त/कलाकाराची वाटचाल/कादंबरी/मुलाखत)

२९. नेमाडे : निवडक मुलाखती (लोकवाङ्‌मयगृह)
३०. बातचीत महेश एलकुंचवारांशी : आशीष राजाध्यक्ष, समिक बण्डोपाध्याय, संजय आर्वीकर (राजहंस प्रकाशन)
३१. लमाण : डॉ. श्रीराम लागू (पॉप्युलर प्रकाशन)
३२. एका खेळियाने : दिलीप प्रभावळकर (अक्षर प्रकाशन)
३३. त्या वर्षी : शांता गोखले (मौज प्रकाशन गृह)
३४. जगाच्या पाठीवर (अपुरं आत्मचरित्र) : सुधीर फडके (राजहंस प्रकाशन)
३५. छंदांविषयी : अनिल अवचट (मॅजेस्टिक प्रकाशन)

वेगळ्या वाटा, नवी क्षितिजे

(अनुभवकथन/चरित्रं/ललितलेखन/कवितासंग्रह)

१. इडली, ऑर्किड आणि मी : विठ्ठल कामत (मॅजेस्टिक प्रकाशन)
२. ही श्रींची इच्छा : श्रीनिवास ठाणेदार (केमीर पब्लिकेशन्स)
३. डॉ. आनंदीबाई जोशी (काळ आणि कर्तृत्व) : अंजली कीर्तने (मॅजेस्टिक प्रकाशन)
४. नर्मदा परिक्रमा (एक अंतर्यात्रा) : भारती ठाकूर (गौतमी प्रकाशन)
५. हसरी किडनी : पद्मजा फाटक (अक्षर प्रकाशन)
६. माझा साक्षात्कारी हृदयरोग : अभय बंग (राजहंस प्रकाशन)
७. विवेक आणि विद्रोह : अरुणा ढेरे (पद्मगंधा प्रकाशन)
८. एका रानवेड्याची शोधयात्रा : कृष्णमेघ कुंटे (राजहंस प्रकाशन)
९. मार्क इंग्लीस : डॉ. संदीप श्रोत्री (राजहंस प्रकाशन)
१०. शहाण्यांचा सायकिएट्रिस्ट : आनंद नाडकर्णी (समकालीन प्रकाशन)
११. ताई, मी कलेक्टर व्हयनू! : राजेश पाटील (ग्रंथाली)
१२. माझंही एक स्वप्न होतं : वर्गिस कुरियन (अनु : सुजाता देशमुख) (राजहंस प्रकाशन)
१३. धाकट्याच्या नजरेतून : अलका गोडे (राजहंस प्रकाशन)
१४. खरेखुरे आयडॉल्स : सुहास कुलकर्णी (समकालीन प्रकाशन)
१५. कुणा एकाची भ्रमणगाथा : गो. नी. दांडेकर (मौज प्रकाशन गृह)
१६. सोन्याच्या धुराचे ठसके (पाव शतकी सौदी अनुभव) : डॉ. उज्ज्वला दळवी (ग्रंथाली)
१७. कोसबाडच्या टेकडीवरून : अनुताई वाघ (ऋचा प्रकाशन)
१८. कार्यरत : अनिल अवचट (मॅजेस्टिक प्रकाशन)
१९. बलुतं : दया पवार (ग्रंथाली)
२०. कोल्हाट्याचे पोर : किशोर शांताबाई काळे (ग्रंथाली)
२१. माझे विद्यापीठ : नारायण सुर्वे (पॉप्युलर प्रकाशन)

रंग उमलल्या मनांचे

(कल्पनाधिष्ठित)

१. शाळा : मिलिंद बोकील (मौज प्रकाशन गृह)
२. वनवास, पंखा, झुंबर, शारदासंगीत : प्रकाश नारायण संत (मौज प्रकाशन गृह)
३. चौघीजणी : शांता शेळके (मेहता पब्लिशिंग हाऊस)
४. ज्वाला आणि फुले : बाबा आमटे (रसिक आन्तरभारती)
५. कोसला : भालचंद्र नेमाडे (पॉप्युलर प्रकाशन)
६. रणांगण : विश्राम बेडेकर (देशमुख आणि कंपनी)
७. रक्तपुष्प : महेश एलकुंचवार
८. माझ्या मनाची रोजनिशी : अंजली कीर्तने (मॅजेस्टिक प्रकाशन)
९. आणि तरीही मी : सौमित्र (पॉप्युलर प्रकाशन)
१०. मौनाची भाषांतरे : संदीप खरे (कॉन्टीनेन्टल प्रकाशन)
११. आमचा बाप आन् आम्ही : डॉ. नरेंद्र जाधव (ग्रंथाली)

(माहिती संकलन/लेख)

१२. अस्वस्थ दशकाची डायरी : अविनाश धर्माधिकारी (मेहता पब्लिशिंग हाऊस)
१३. गध्देपंचविशी : आनंद नाडकर्णी (मॅजेस्टिक प्रकाशन)
१४. आजच्या ठळक बातम्या : समीरण वाळवेकर (राजहंस प्रकाशन)
१५. आमचा काय गुन्हा : रेणु गावस्कर (शब्द पब्लिकेशन)
१६. नागरिक : अविनाश धर्माधिकारी (मेहता पब्लिशिंग हाऊस)

Taxonomy upgrade extras: