'निरभ्र' - लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री परिसंवाद विशेषांक

संपादकीय

हे निखळ माणूसपण अनुभवणे ही कदाचित एका अतिशय सुंदर अशा समाजाच्या घडण्याची नांदी असेल का? तसे असेल तर समाजाचा अर्धा भाग असलेल्या स्त्रियांनी महिला दिनाचे निमित्त साधून माणूसपणाला हाक घालणार्‍या लिंगनिरपेक्षतेबद्दल चर्चा करण्याचे योजणे हे वावगे ठरू नये.

आलेल्या लेखांसंदर्भाने..

आलेल्या लेखांपैकी क्वचित एखाद्या लेखात विषयाच्या व्याप्तीला स्पर्श केलेला दिसला. बर्‍याचशा लेखांमध्ये लिंगनिरपेक्ष मैत्रीच्या अनुषंगानेच चर्चा केलेली दिसून आली

लिंगाधारित व्यक्तिमत्त्व

व्यक्तिमत्त्वाच्या बर्‍याच बाजू असू शकतात - त्या जशा एखाद्याच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीमधून दिसतात, एखाद्याच्या आवडीनिवडीतून दिसतात, तशाच एखाद्याच्या स्वतःच्या लिंगाबद्दलच्या कल्पनेतूनही दिसतात. पण मुळात स्वतःच्या लिंगाबद्दलची कल्पना प्रवाही / बदलती असू शकते.
- तनया मोहन्ती (अनुवाद - नानबा)

दिल है के मानता नही!

’व्हॉट इज द बेस्ट एज टू लूज व्हर्जिनिटी’ असा प्रश्न नववीतल्या एका मुलीने भर वर्गात विचारला हा माझ्यासाठी मोठा ’कल्चरल शॉक’ होता.
-आगाऊ

एक चूक अशीही..

आत्तापर्यंतच्या माझ्या शालेय जीवनात मला शिक्षिका कधीच नव्हती. त्यामुळे शिकवणे हे फक्त पुरुषाचे काम आहे अशीच माझी धारणा होती. एखाद्या मुलीने मला काही शिकवावं, हा माझ्या दृष्टीने कमीपणा वाटत होता.
-शाम

लिंगनिरपेक्ष मैत्री-ओळख

आपली लैंगिक जाणीव ही आपली पहिली ओळख असते........स्वतःलाही नि इतरांनाही........त्यामुळे लिंग निरपेक्ष ओळख होण्यात पहिली अडचण येते ती आपल्या लिंगाची.
-दीपक भिडे

लिंगनिरपेक्ष मैत्री - ओळख : काही विचार-तरंग

मला पौर्वात्य तत्त्वज्ञान व अध्यात्मातील 'तुम्ही म्हणजे फक्त तुमचे शरीर नाही, तुम्ही चेतनास्वरूप आहात', हा विचार फार आवडतो व पटतो. शरीराने आणि समाजाने घातलेल्या व घालून घेतलेल्या बंधनांतून हा विचार मुक्त करतो.
-अरुंधती कुलकर्णी

गैरसमजांच्या विळख्यातील लिंगनिरपेक्षता

आपली शारीरिक ओळख आणि आपली मानसिक/सामाजिक ओळख ह्या दोन्ही आपल्याच व्यक्तिमत्त्वाचा भाग असल्याने दोन्हींचा स्वतंत्रपणे विचार करणे फार गुंतागुंतीचे होऊन बसते आणि त्यातून ’लिंगनिरपेक्ष’ हा शब्द समजून घेण्यातच गल्लत होते.
-अगो

लिंगनिरपेक्षता आणि फ्रॉईडचा सिद्धान्त

त्यामुळेच कदाचित ट्रेनमध्ये त्यांच्यासमोर प्रचंड अंगप्रदर्शन करणारी तरुणी आली तरीही ते पुरुष तीळमात्रही विचलित होत नाहीत. त्यांचे पेपरमध्ये खुपसलेले डोळेही बाहेर येत नाहीत आणि इतर स्त्रियाही 'काय बाई हिने कपडे घातलेत', म्हणून नाकं मुरडत नाहीत...
-सानी

लिंगनिरपेक्षता समजून घेताना

आमच्यालेखी छोटासा असणारा प्रत्येक दगड हा थेट कुठल्यानाकुठल्या अलिखित लिंगाधारित परंपरेच्या मोहोळाला लागतोच. त्यामुळे दंश आणि दाह अपरिहार्य.
-रैना

मैत्र

पण माझे हेही निरीक्षण आहे की स्त्री पुरुषांची मैत्री ही बाकीच्या लोकांना सहन होत नाही. याची नेमकी कारणे काय असावीत हे मला सांगता येत नाही.
-दिनेशदा

..अनुभवू हा वैविध्यसोहळा

मला आठवतंय, कॉलेजला असताना मनातल्या मनात त्या दोघांचा इतका हेवा वाटायचा की काय सांगू. अनेकदा स्वतःशीच कल्पना केली जायची की आत्ता त्याच्यासारखा आपलाही एखादा मित्र असता, तर त्याच्याशी या या विषयावर बोलता आलं असतं.
-ललिता-प्रीति

लिंगनिरपेक्षता सोयीनुसार की प्रामाणिक?

वयाच्या तिशीला आल्यावर अचानक मला मेल डॉक्टरकडे उपचार घ्यावेसे वाटू नयेत हे माझ्याही आकलनशक्तीपलीकडचं. कळतयं पण वळत नाही असं काहीसं.
-shilpa_ka

'लिंगनिरपेक्ष ओळख - मैत्री' चर्चा

निरभ्र : लिंगनिरपेक्ष ओळख-मैत्री परिसंवाद विशेषांक आता तुमचा वाचून झाला असेल किंवा वाचत असालच. अंकामधे जाहिर केल्याप्रमाणे या विषयाच्या सर्व पैलूंवर सर्व बाजूने चर्चा होणे अतिशय गरजेचे आहे. त्याशिवाय विशेषांक पूर्ण होणार नाही.
या धाग्यावर लिंगनिरपेक्ष मैत्री - ओळख (आयडेन्टिटी) या विषयाची चर्चा करूया.

संपादक मंडळ

मुख्य संपादक : नीधप
संपादक मंडळ: अगो, नादखुळा, नानबा, पराग, सानी, स्वाती२