विश्व नेमकं कसं निर्माण झालं?', 'विश्वात आपण एकटेच आहोत का?'पासून अगदी, 'खून झाला तेव्हा घरात कुणीच नव्हतं, मुख्य दार आतून बंद आहे. एसी चालू असल्याने खिडकीही बंद आहे. मग खून केला कुणी आणि कसा?', '...एका दारावरचा पहारेकरी नेहमी खरं बोलतो आणि एका दारावरचा नेहमी खोटं. केवळ एकच प्रश्न विचारून तुम्ही योग्य दार कसं शोधाल?' अशी माणसाला पडणारी असंख्य कोडी, अनेक रंजक प्रश्न. आणि त्या कोड्यांची बरोबर उत्तरं गवसली की मिळणारा आनंद. समोर दिसणार्या गोष्टींमधून मिळणार्या क्ल्यूंची साखळी जोडत, मेंदूला ताण देत, फसव्या क्ल्यूंना वेळीच ओळखून न भरकटता बरोबर उत्तरापर्यंत पोचणं, हा बहुतेकांना आवडणारा खेळ असतो.
'पुणे-५२'च्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत असाच एक खेळ.
खाली दहा कोडी आहेत. प्रत्येक कोड्यात काही चित्रं आहेत.
या चित्रांचा एखाद्या व्यक्तीशी, घटनेशी, अंकाशी किंवा शब्दाशी संबंध आहे. ही व्यक्ती, घटना, अंक किंवा शब्द ओळखून तुम्ही कोड्याच्या क्रमांकाच्या चौकटीत लिहायचं आहे. उत्तरे लिहिण्यासाठी चौकटी सर्व कोड्यांच्या शेवटी आहेत.
१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

९.

१०.

तर मग तुमच्या 'करड्या पेशीं'ना लावा कामाला आणि पाठवा आम्हांला कोड्यांची उत्तरं! शक्य तितक्या लवकर! वेळेची उलटमोजणी सुरू झाली आहे...