मला पाहुनी टाळणे सोड आता (गझल)



मला पाहुनी टाळणे सोड आता
जिवाला असे जाळणे सोड आता

जगाची कशाला तुला काळजी ही
मिठीतून ओशाळणे सोड आता

तुझा वर्ण लाजून झाला गुलाबी
गुलाबावरी भाळणे सोड आता

तुझा श्वास हा दरवळे भोवताली
सखे मोगरा माळणे सोड आता

कवी : श्रीराम पत्की
संगीतकार : विवेक काजरेकर
गायक : प्रतीक शेट्ये

या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं संपूर्णपणे श्री. काजरेकर यांच्या कुवेत येथील होम-स्टुडिओमध्ये ध्वनिमुद्रित झालं असून त्यात वापरलेली सर्व वाद्यं (संतूर, सतार, तबला, स्ट्रिंग्ज, बेस गिटार, रिदम गिटार व इतर साईड रिदम) त्यांनी स्वत: संगणकावर सॉफ्टवेअरच्या सहाय्याने वाजवली आहेत. गायकाचा आवाज सोडल्यास सगळं काही संगणकावर व सिंथेसाइझरवर प्रोग्रॅमिंग केलेलं आहे.