क्षणात दिसते, क्षणात नसते
कसे क्षणाला, कुणी धरावे?
मोजमाप कसल्या अंकांचे
क्षणात क्षणही, विरून जावे
कसे क्षणाला...
तुझा नी माझा, बंध क्षणाचा
क्षणाचाच अवकाश तुटाया
नवे बंधही क्षणात सारे
किती पुरावे, किती उरावे
कसे क्षणाला...
क्षणा सोबती, श्वास नव्याने
श्वासासंगे क्षण वेचावे
कुणी दूरच्या क्षणी भेटण्या
क्षणी असावे, क्षणी नसावे
कसे क्षणाला...
क्षणा क्षणाचे धागे रंगीत
रेशीमगाठी होऊन जावे
कसे कळेना कुठले धागे
किती तुटावे, किती जुळावे
कसे क्षणाला...
-जाह्नवीके
प्रतिसाद
आवडली.
आवडली.
क्षणोक्षणी अधिकाधिक आवडत
क्षणोक्षणी अधिकाधिक आवडत जाणारी कविता सुंदर सादर केली आहे.
छानै!
छानै!
सगळ्यांना धन्यवाद! आणि
सगळ्यांना धन्यवाद! आणि दिवाळीच्या शुभेच्छा....
सादरीकरणातून अधिक उलगडणारी
सादरीकरणातून अधिक उलगडणारी कविता. छानच.
<<कसे क्षणाला, कुणी
<<कसे क्षणाला, कुणी धरावे?>>
छान संकल्पना आणी सादरीकरण.
पुन्हा पुन्हा ऐकायला भाग
पुन्हा पुन्हा ऐकायला भाग पाडणारी मनोवेधक रचना.
उत्कृष्ठ सादरीकरण.
छान... सादरीकरण मात्र थोडे
छान... सादरीकरण मात्र थोडे अधिक चांगले करता आले असते.. विशेषतः शेवटच्या कडव्यात काव्य संपले या अनुशंगाने शब्द/आवाज्/वजन फेक हवी.
छान आहे
छान आहे :)
कविता खूप छान!
कविता खूप छान!
धन्यवाद.... खूपच दिवसांनी
धन्यवाद....
खूपच दिवसांनी मायबोली उघडलं......
छान!
छान!