कुणाचा?

पाहूनी जखमा कळाले वार होता तो कुणाचा
अन् तगादे सांगती, उपकार होता तो कुणाचा

लाख वेळा कोसळूनी का मला हे कळत नाही
मारला धक्का कुणी? आधार होता तो कुणाचा?

काल रात्री गरज होती देह देहा भेटण्याची
गरज नव्हती जाणणे, शेजार होता तो कुणाचा

राखले आम्ही तळे पण चाखला ना थेंब आम्ही
त्या जळावर शेवटी अधिकार होता, तो कुणाचा?

दानवांची लोकसंख्या तेवढीच्या तेवढी, मग
ऐकतो ज्याच्या कथा, अवतार होता तो कुणाचा?

-जयन्ता५२

प्रतिसाद

सगळ्याच द्विपदी खासच! आधार खूपच सही!

गझल आवडली. "आधार" आणि "अवतार" विशेष. "शेजार"चा शब्दखेळही आवडला, पण त्या द्विपदीची लय सुधारता आली असती असे वाटते.

मस्त... सगळेच उत्तम शेर!

सही !!
अवतार.......खासच !

अवतार आवडेश..

खूप छान

धन्यवाद! दोस्त लोक!
जयन्ता५२

छानच्.आवडली गझल.

सह्हीच्च! आवडली.

सुन्दर........!!