ऋतू अंतरीचे...

वेळ थांबली दारात
उसाश्याच्या काठावर

नीज वेशीपाशी झुले
रातराणी अंगणात

तारकांचा तो झुंबर
मनी घालतसे पिंगा

साठवांच्या त्या घागरी
अन ऊरी असे दंगा

दुः ख आटवूनी घ्या रे
करा सुखाचि पखरण

रात मावळत येता
उजाडेल नवा दिस..

- ऋतुवेद

प्रतिसाद

अफाट सुंदर! इतक्या कमीत कमी शब्दात केवढा उच्च अर्थ प्रगट केला. अभिव्यक्ती आवडली.

दुः ख आटवूनी घ्या रे
करा सुखाचि पखरण

!!! सुरेख!

छान.
>>>इतक्या कमीत कमी शब्दात केवढा उच्च अर्थ प्रगट केला <<< +१

खरंच इतक्या कमी शब्दात असं व्यक्त होणं........ क्या बात है !!

अतिशय सुंदर!

फार सुरेख जमली आहे :)
सावकाश, नीट वाचल्यावर थेट पोचली.. :)
अभिनंदन!

छान कविता!

बि, अवल, जयवि, चिन्नु आणि बित्तुबन्गा...धन्यवाद! कविता आवडली हे पाहुन आनंद झाला.
नचिकेत :)