शिशिरातली कविता

shishiratelee kavitaa 1_f.jpg

शिशिरातल्या रात्री मी चालत जातो
एका निबिड अरण्यात
सोबतीला असतं
तुझं हसणं.. सैरभैर

वाटेमधल्या प्रत्येक वळणावर
तुझे ते ऐसपैस पसरलेले कोनाडे
आणि त्या कोनाड्यात तेजाळलेलं चांदणं
सोबतीला असतं
तुझं हसणं.. सैरभैर

शिशिरातल्या त्या रात्री
मी पुढे चालत जातो
माझ्या अंधारगर्भ क्षितिजापर्यंत
निरभ्र आकाश आणि मोकळे श्वास वगैरे
शोधत अनुभवत
असंच काहीसं
सोबतीला असतं
बहुतेक तुझं हसणंच.. सैरभैर

- देवा

प्रतिसाद

फारचं छान! सुंदर शब्दरचना.

>>वाटेमधल्या प्रत्येक वळणावर
तुझे ते ऐसपैस पसरलेले कोनाडे
आणि त्या कोनाड्यात तेजाळलेलं चांदणं

आवडलं!

शब्दयोजना आवडली...

चित्रात चांदणं आहे की दिवस?