शब्दकोडे (गजानन)

शब्दकोडे
01_HDA2012_shabdakode_GD.jpg

आडवे शब्द :
१. डोक्यात उलट-सुलट विचारांचा गोंधळ होऊन होणारी मनाची अवस्था
४. बहुमत
६. रूप बदलून सीतेच्या मनाला भुरळ घालणारा दैत्य
८. मनवळवणी, तरफदारी, मध्यस्थी
१०. धूर्त, चलाख
११. नखरेल बाई
१३. जिव्हारी झालेली जखम, रहस्याचा स्फोट
१५. जंगल, अरण्य
१७. संरक्षणार्थ धारण केलेले साधन
१८. एक चर्मवाद्य
२०. हद्दपारीची शिक्षा भोगण्याचे ठिकाण
२१. गाण्याची मैफल
२२. एक वृक्ष
२४. रोजच्या आहारातले एक तृणधान्य
२५. लग्नाची वाजतगाजत काढलेली मिरवणूक
२६. कर्णमधुर स्वरांची मालिका, तान
२८. भव्य कक्ष
२९. गुर्मी, ताठा
३१. पांढरा, धवल
३२. करार
३५. एक खडकाचा प्रकार
३७. कन्या
३९. रसाने टिच्चून भरलेला
४२. झाड, वृक्ष
४३. एकत्र येणे, मेळ
४५. इंग्रजीत भाजीपाला
४६. माता, आई
४८. सेवक
५१. अंगचोर, चुकून उरलेला
५३. सांकेतिक, सूचक, प्रतीकात्मक
५६. सभासद
५७. जानकीचा पती
५८. एक रानमेवा

उभे शब्द :
१. दानव, वाईट वृत्तीचा
२. बासरीवर वाजवण्यास अवघड असलेला एक राग
३. दात, दंत
४. कामवासना
५. सराव, उजळणी
६. ताडण, चोप
७. घोडेस्वाराचे पाय ठेवण्यासाठी घोड्याच्या पाठीवरून दोन्ही बाजूस सोडलेली कडी
९. लोकनाट्यातील एक भाग, ढोंग
१०. अतोनात, दम कोंडला जाईल इतका
१२. पृष्ठभागावरचा वेगळा झालेला तुकडा
१४. घाबरवणे, अत्यंत चिंताग्रस्त करणे
१६. वरिष्ठाला द्यावयाची भेटवस्तू
१७. महाराष्ट्रातील एक नगदी पीक
१९. एका अवस्थेतून दुसर्‍या अवस्थेत जाणे / नेणे
२१. सांभाळ, जोपासना
२३. चमकणारा, झळकणारा
२४. राजदरबारातील रक्षक
२७. निशाण, पताका
२८. वारसा, वडिलोपार्जित मिळकतीतला हिस्सा
३०. अतोनात श्रीमंती
३३. अर्क, सत्व
३४. फायदा, भले
३६. एक लोकनाट्याचा प्रकार
३८. रात्र, रजनी
४०. नेहमी, कायम
४१. वारा धरण्यासाठी गलबतावर उभारलेले साधन
४४. तीव्र संताप, विंचवाने नांगीने केलेला आघात
४७. एक ठसकेबाज नाते
४९. मुजरा, नमस्कार
५०. एक तांबडे रत्न
५२. सुट्टी, कामातला खाडा
५४. हात
५५. छंद, आवड

उत्तरे :
शब्दकोड्याचे उत्तर

प्रतिसाद

अंक चाळतो आहे.
सुंदरच झालाय. पण हे कोड्याचं उत्तर लपवता नसतं आलं का? :(

हे आवडलच...

"कोणे एके काळी" वर्तमानपत्रातील शब्दकोडी सोडवणे हा आवडता ऊद्योग असे.

आता हे कोडं सोडवायला घेतलं तर कळून चुकले की माझे मराठी मधले ज्ञान्/व्यासंग नक्कीच कमी पडतो आहे. नेमके मराठी शब्द येत नाहीत या अर्थी...

योग, धन्यवाद. सुटले का / कितपत सुटले? :)

इब्लिस, आपल्या सूचनेप्रमाणे संपादकांनी उत्तर इथून दुसरीकडे छापलेय. तुमचाही अभिप्राय जरूर कळवा.

संपादकांचे आभार.

क्या बात है! शब्दकोडं! वा वा! आत्ताच सोडवायला घेते.

पैलवान,
आज इकडे लक्ष गेले. अगदी तीन-चारच उत्तरं चुकलीत तुमची नाहीतर सगळे सोडवलेत की! :)