गहिवरल्या सूर्याचे
कोंडतात श्वास हळू
सावलीत वार्याला
हेही लागेल कळू
ऊन पुरे वनवासी
प्रलयाच्या रमलखुणा
मायावी करुणाष्टक
आळवते कोण पुन्हा?
मध्यान्ही डोईवरी
पदर पुरा पडतो का?
उंबर्यात नाव घेत
प्राण तुझा अडतो का?
भर उन्हात येताना
पोळतील पाय जणू?
ये काळीज अंथरतो
यापरते काय म्हणू?
- जया एम
प्रतिसाद
काय भन्नाट कविता आहे! खूप खूप
काय भन्नाट कविता आहे! खूप खूप आवडली.
सुंदर.ग्रेसांचा प्रभाव
सुंदर.ग्रेसांचा प्रभाव जाणवतोय.
सुंदर. लयबद्ध आणि तरल
सुंदर.
लयबद्ध आणि तरल कविता.
फार आवडली.
सुंदर.फार आवडली कविता. किती
सुंदर.फार आवडली कविता.
किती दिवसांनी लिहीले तुम्ही !!
आणखी लिहायला हवे होते. मस्तच
आणखी लिहायला हवे होते. मस्तच आहे कविता.
कविता सुंदरच... सादरीकरण
कविता सुंदरच... सादरीकरण मात्र अगदी कोरडे वाटले.
सुरेख. तुमच्या कविता वाचताना
सुरेख. तुमच्या कविता वाचताना एक चित्र उभे राहते डोळ्यांसमोर :)
किती दिवसांनी लिहीले तुम्ही !! >>> +१
सुंदर!
सुंदर! :)
सुंदर.फार आवडली कविता. >> ++१
सुंदर.फार आवडली कविता. >> ++१
आवडली!
आवडली!