मन



man.jpg उतावीळ मन फुलपाखरू
हातात गावेना
आभाळी मावेना
कसं आवरू? कसं सावरू?

अवखळ मन श्रावणधारा
क्षणात झरती
क्षणात विरती
फुलतो नाचरा मोरपिसारा

आतुरले मन चातक खुळा
तृषार्त, व्याकूळ
घेतसे चाहूल
बरसेल कधी मेघ सावळा?

अनावर मन सागरलाटा
वेळ भरतीची,
ओढ परतीची
बेभान, बेफाम, बेबंद लाटा

अनुरक्त मन, तन्मय मीरा
सावळ्याची छाया
ब्रह्मलीन माया
अंतरी नांदतो कृष्ण साजिरा

-क्रांति

प्रतिसाद

मस्त ... कविता.. सादरीकरण ... सगळंच छान!

क्रान्ति.........एक वेगळीच लय आहे गं.......मस्तच !

वेगळा, सुंदर फॉर्म, लयदार,छान हाताळणी.. फक्त पहिल्या कडव्यातलं 'आभाळी मावेना' जरा वेगळं हवं होतं असं वाटलं.

अप्रतिम.

वा मस्त ! सुंदर फॉर्म :)

शाम +१ :)

कवितेतील भाव आवडले. सादरीकरणही अगदी भावपूर्ण!

क्रांति, खरच वेगळा घाट आहे... का कुणास ठाऊक हे सुरांसकट उमटलेले शब्दं वाटतायत. कविता आवडलीच. चालीसह ऐकायला खरच आवडेल. सादरीकरणाबद्दल शब्दंच नाहीत... सुर्रेख.

क्रांति,
सुंदर.. सूरमाय मध्ये सालंकृत येऊ देत ना!

सुरेख आणि भावपूर्ण :)

बेभान, बेफाम, बेबंद लाटा >>> इथे क्रांति ह्यांनी 'वाटा' म्हटलं आहे.

सादरीकरणही अगदी भावपूर्ण! >> ++१

मनाचे खुळे रंग सुरेखपणे टिपलेस गं ताई.. कवितेचा फॉर्म वेगळा आहे-आवडला..
शेवटचे कडवे तर वाह!

शेवट खुपच आवडला !

मनाचे खुळे रंग सुरेखपणे टिपलेस गं ताई.. कवितेचा फॉर्म वेगळा आहे-आवडला..
>>>
+१

सादरीकरणात द्विरुक्ती मुद्दाम केली आहे का? की तसेच नॉर्मली करतात? माफ करा पण मी कविता वाचन स्वतः ही कधी केले नाहीये आणि जास्त कधी ऐकले ही नाहीये. मला पर्सनली ती द्विरुक्ती अनावश्यक वाटली.

क्रांति, तुमचा आवाज गोड आहे. :-)