अंतरे (गझल)

नाव नव्हते दिले, प्रेम केले खरे
आठवू लागता लोपले चेहरे

आत डोकावण्या मी उभा राहिलो
आरसे जाहले कावरेबावरे

झगडुनी शेवटी जीव त्यांनी दिला
सोसण्याऐवजी फार केले बरे

आठवांचा तुझ्या झोत पडला तसे
ह्या मनाचे सुने उजळले कोपरे

कारणे वाढली, अर्थ शब्दाळले
भावनांवर खर्‍या खोल पडले चरे

हेलकावे किती आतल्या आत हे!
मन बिचारे किती शोधते आसरे!

ज्या क्षणी सत्य स्वीकारती माणसे
त्याक्षणी काळही मिटवतो अंतरे

- नचिकेत जोशी

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

मस्त रे

कोपरे आणि आसरे हे शेर सर्वात विशेष वाटले.

वा! मस्त आहे ही गझल.

ज्या क्षणी सत्य स्वीकारती माणसे
त्याक्षणी काळही मिटवतो अंतरे
.... खुपच छान!

खूप आवडली गझल.

छानच..

अतिउत्तम गझल फार्फार आवडली

aavdesh

आरसे आणि चरे हे शेर आवडले. छान.

सुरेखच...

छानच ....

सर्वांचे आभार :)

स्पिचलेस....