शब्दात भावनांना, बांधायचे कशाला
जे उमजले मनांना, बोलायचे कशाला
झाली फुले कळ्यांची, हे सांगतो सुगंध
बोलावल्याविनाही येतोच की मिलिंद
शब्दाविनाच सार्या फुलतात पुष्पमाला
शब्दात भावनांना, बांधायचे कशाला
शब्दाविनाच येथे, गातात गोड पक्षी
खुलवी नभास साऱ्या रेखीव मेघनक्षी
हर्षात गात वारा वाहे सुखावलेला
शब्दात भावनांना, बांधायचे कशाला
शब्दाविनाच सारी किमया मनी घडावी
शब्दाविना मनेही अपसूक ती जुळावी
जुळतात सूर तेव्हा बोलायचे कशाला
शब्दात भावनांना, बांधायचे कशाला
- (jo_s) सुधीर

प्रतिसाद
जुळतात सूर तेव्हा बोलायचे
जुळतात सूर तेव्हा बोलायचे कशाला
शब्दात भावनांना, बांधायचे कशाला >>> व्वा ! छानच.
अप्रतिम.
अप्रतिम.
वा..सुंदर!
वा..सुंदर!
आवडली.
आवडली.
फार फार आवडली कविता ह्या
फार फार आवडली कविता
ह्या कवितेची निवड केल्याबद्दल संपादकांचे आभार
उल्हास, अन्जू , श्यामली,
उल्हास, अन्जू , श्यामली, भारती, वैभव
धन्यवाद
सुंदर!
सुंदर!
वा सुधीर, खूपच सुंदर कविता
वा सुधीर, खूपच सुंदर कविता आहे.
कविन, शशांक आभारी आहे
कविन, शशांक
आभारी आहे