शब्दकोडे क्र. २

2014HDA_shabdkode_2.JPG
आडवे शब्द -
१. एक दागिना, जो तुमचा इतरांपेक्षा किंचित सरस आहे ते पाहायला आरसा लागत नाही!
३. तुम्हांला हे क्वालिफिकेशन मिळाले की तुम्ही नोकरी, छोकरी आणि गाजर का हलवा याला एके काळी पात्र होता
७. सामान्य
११. तरंगणे
१२. प्रेक्षणीय आणि श्रवणीयसुद्धा?
१३. उष्ण
१५. आयुर्वेदातील संज्ञेनुसार मानवी प्रकृतीचा एक प्रकार
१६. अजून एक खाण्याचा प्रकार! पण खाऊ नका, ही खाल्ल्यास माघार घ्यावी लागेल!
१८. या पदार्थाची चर्चा बरेच जण करतात पण कुणी कधी खरी चव बघितल्याचे ऐकिवात नाही!
२१. थंडीने हुडहुडी भरणे
२२. गरुडाशी याचा काही संबंध नाही, असलाच तर त्याच्या शत्रूशीच आहे!
२३. सश्याचे छोट्यांच्या गोष्टीत वापरले जाणारे लाडीक नाव
२४. जास्तीत जास्त, परमावधी
२६. तोंड
२८. अधीन
३०. कार्यक्रमाचे निवेदन, सादरीकरण करणारा
३३. कुणाच्या घरी जेवायला गेलात तर हे मोजू नका!
३५. समूह, कंपू
३६. हट्टी, अयोग्य असले तरी आपलेच घोडे दामटणारा
३८. जीभ, स्वाद
३९. डावीकडे वळू नका, तो योग्य रस्ता नव्हे.
४०. असहाय, केविलवाणा
४१. सैन्याची तुकडी.
४३. वरकरणी कडक पण मनाने प्रेमळ माणसासाठी वापरून गुळगुळीत झालेली उपमा!
४५. धोका, फसवणूक
४७. स्त्री
४८. पृथ्वी
४९. हा विदर्भात उपम्यावर, पोह्यांवर घालून खातात, इडलीवर नव्हे!
५०. दोन डोंगरांच्या मधला खोल भाग
५१. किळसवाणा
उभे शब्द-
१. एरवी काणा म्हणत असले तरी याचं बारीक लक्ष असतं सगळीकडे!
२. हा नेहमी तळमजल्यावर राहतो. याचं घर वर असूच शकत नाही!
३. परंतु
४. हाताची बोटे फाकवली असताना अंगठ्याच्या टोकापासून ते करंगळीच्या टोकापर्यंत अंतर
५. अनेक गुन्हेगारांचे अटकसत्र अशा संदर्भात वापरला जाणारा हा शब्द त्याच अर्थाच्या, पण दोन वेगवेगळ्या शब्दांनी बनला आहे.
६. युद्ध
७. दोन्ही हात सारख्याच सफाईने वापरू शकणारा
८. आपण याच्या टेबले खुर्च्या बनवू पण पंजाबी लोक हे चक्क खायला वापरतात जेवणात!
९. समजूत
१०. रिचव आणि मज्जा कर?
१४. मेलेल्या शेळीचा गुणधर्म ?
१५. वेडावून दाखवणे
१७. एरवी येताजाता तोंडात टाकायला छानच , पण हे लोखंडाचे असले तरी खावे म्हणे!
१८. लाकडी लेखणी, टाक.
१९. गोग्गोड, अति प्रेमळ
२०. विशेषतः लौकिकास न जागणारे श्रीमंत लोक या धातूचा दागिना घालतात
२२. या प्राण्याला गोड आवडत नसावं, धार्मिक प्रवचनांतही गोडी नसावी, पण तरी मोठे लोक अडल्यास याचे पाय धरायला येतात !
२३. इकडे तिकडे चोहीकडे
२५. मोठ्या गावात राहणारा तालेवार नातेवाईक
२६. सागरी किल्ला
२७. एक पाळीव प्राणी. एका टवाळी - चेष्टामस्करीला वाहिलेल्या टीव्ही कार्यक्रमाचेही नाव आहे!
२९. बहुतेकांचे आवडते योगासन!
३०. सवलत
३१. मोठा बदल
३२. दुफळी
३४. सैन्य
३५. नाहीसे, गायब
३७. पाणि, प्रसाद असल्यास घेणे, किंवा मग एकाने दुसर्‍याला देताना तिसर्‍याने मध्ये येऊन झाकणे!
३८. गझलेत यमकाच्या मागे 'डबलसीट' म्हणून येणारा शब्द अथवा शब्दसमूह. मूळ अरबी शब्द.
३९. रस्त्यात अडवून लुबाडणे
४२. वाद मिटवण्यासाठी नेमलेला पंच
४३. उपवासाला किंवा दिवाळीला खायचा खाऊ.
४४. एक शिकारी पक्षी
४५. हल्ल्यासाठी संधीची वाट बघत याला धरून बसतात!
४६. थंड
४८. उष्णता, ऊबशब्दकोडे # २ उत्तर


- मैत्रेयी

related1: 

HDA2014_blackseparator.jpg

HDA2014_rangolee4.jpg

HDA2014_blackseparator.jpg
मैत्रेयी
HDA_14_Maitreyee.jpg
मैत्रेयी या न्यू जर्सी येथे राहतात. बारा वर्षांहून जास्त काळापासून त्या मायबोलीच्या सभासद आहेत. मायबोलीवर त्यांनी गेली अनेक वर्षे लेखन केले व चित्रे काढली असून हितगुज मॉडरेटर, दिवाळी अंक संपादन, सल्लागार मंडळ, मुद्रितशोधन, गणेशोत्सव समिती, संयुक्ता व्यवस्थापन इत्यादी बर्‍याच मंडळांत कामही केले आहे. तसेच लेखन, व्यंगचित्रे इ. मध्येही त्यांचा सहभाग असतो.

HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

३७. पाणी, प्रसाद असल्यास घेणे, >>>> इथे पाणी नव्हे " पाणि " असेच आहे!! चुकीचा मुशो झाला आहे!!

मस्त आहे हे शब्दकोडे. शब्दांच्या हिंट्स नाविन्यपूर्ण आहेत. आॅनलाईन सोडवता आले असते तर बहार आली असती.