पुनरागमन

पडछायांमधून आले आहे बाहेरी
वळत्या वाटांनी पुन्हा मनाच्या माहेरी
बदलले काही? बदलले मीही? की नाहि तसे?
ते जुनेच अंगण नव्या प्रभांनी जागतसे..


पावले अडावी उंबरठ्याशी मूकपणे
त्यानेही समजुन घ्यावे झालेले जगणे
तोही झिजलेला ओझ्यांनी गतवर्षांच्या
पचवून कहाण्या शोकांच्या अन् हर्षांच्या


घर उभेच आहे जराजरासे थकलेले
मन माझेही तडजोडी करून झुकलेले
वेढतो मला दशबाहूंनी पण परिसर हा
सांगतो मला, ’’येथलीच तू, येथेच रहा..’’







































related1: 

HDA2014_blackseparator.jpg

HDA2014_rangolee12.jpg

HDA2014_blackseparator.jpg
भारती बिर्जे डिग्गीकर
HDA_14_BharatiBirjeDiggikar.jpg
भारती बिर्जे डिग्गीकर यांचा 'मध्यान्ह' हा पहिला कवितासंग्रह मौज प्रकाशनाकडून २००६मध्ये प्रकाशित झाला व 'चंद्रस्वप्न एकले ' या ध्वनिफितीसाठी २००५मध्ये त्यांना झी मराठीकडून (तेव्हाचा अल्फा गौरव) सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार मिळाला आहे. त्याआधी त्यांनी 'अभिरुची' मासिकाच्या संपादनात कै.पुरुषोत्तम आत्माराम चित्रे यांना अनेक वर्षे सहकार्य केले व 'अभिरुची'मधूनच त्यांच्या सुरुवातीच्या बऱ्याच कविता प्रकाशित झाल्या. यावर्षी मे २०१४मध्ये त्यांचे 'रस-सिंधू' हे मायबोलीवर प्रकाशित केलेल्या विविध रसग्रहणपर लेखांचं ई-पुस्तक ई-साहित्य प्रतिष्ठानकडून प्रकाशित झाले आहे.

HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

भारतीताई, मस्त! :-)

छान! :)

मस्त.

परिचयही आवडला!

काव्य आवडले . परिचयही उत्तम

या शब्दांच्या हुरहुर लावत्या वळणवाटा जुन्याच अंगणी नेऊन सोडणा-या ; तुमच्या ब-याच कविता स्वानुभूतीनंतरच्या गडद चिंतनाचा परिपाक असतात. अगदी निव्वळ कविताच .....

छान कविता. चित्रही अनुरुप

छान कविता. दुसरे कडवे सर्वात छान वाटले.

छान कविता

उत्तम ..

छान कविता

मनापासून धन्यवाद या प्रतिक्रियांसाठी सर्वांचे. अश्विनी, या सुंदर रेखाटनांसाठी तुझे विशेष आभार :)