माती

HDA2014_maati.jpg

मी माझ्या मातृभूमीतून आणून टाकतो
खूप सारी माती
या परक्या मुलखातल्या परसदारी..
पाऊस पडला की
श्वासात आवर्जून भरून घेतो
दूरवर पसरू पाहणारे गंध माझ्या मातीचे...
कधी खूप एकटं एकटं वाटलं की
चालून घेतो अनवाणी पायांनी
माझ्याच मातीत...
मातीशी अजूनही नाळ तुटली नाही
एवढंच समाधान मनाला...
उद्या माझ्याच मातीने मला विचारू नये,
'तुझे नि माझे नाते काय?'
आणि 'पुसू' नये ओळख
आमच्या संबंधाची..
दरवेळी मातृभूमीतून येताना
मी आणत असतो
माझी माती
माझ्यासाठी...

related1: 

HDA2014_blackseparator.jpg

HDA2014_rangoLee3.jpg

HDA2014_blackseparator.jpg


शिल्पा गडमडे
HDA_14_ShilpaGadmade.jpg

शिल्पा गडमडे यांना लिखाणाची आणि वाचनाची आवड आहे. त्यांच्या कथा व कविता वृत्तपत्र, आकाशवाणी इत्यादी माध्यमांतून प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या सध्या जर्मनीमध्ये भारतीय कायदेविषयक सल्लागार म्हणून काम करतात. २००९पासून त्या मायबोलीच्या सभासद आहेत. परदेशात वास्तव्य असताना मराठी भाषा आणि साहित्याशी त्यांची नाळ जोडून ठेवण्यात मायबोलीचा मोठा सहभाग आहे असे त्या आवर्जून सांगतात.

HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

खारुताई, मस्त लिहिली आहेस. मुळं ह्यात मातीत रुजली आहेत आणि झाड तिकडे डवरलं तरी पारंब्या पुन्हा त्याच मातीत जातात :-)

छान कविता.. आवडली..

सुंदर!

छान लिहिले आहेस खारुताई

छान :)

छान आशय.
परदेशात वास्तव्य असले तरी आपल्या देशाच्या मातीशी नाळ न तोडणं
ही भावना चांगली मांडलेय.

छान आशय

सुरेख

हम्म्म्म्म्म