शिळ्या फुलांचा सुगंध ताजा करत नवा काळ येत आहे
तुझी नि माझी जुनी युगे मोहरत नवा काळ येत आहे
पडून आहेत दागिने...... गोठवून अश्रू कमावलेले
तरी पुन्हा लोचनांत मोती भरत नवा काळ येत आहे
इथे न लाटा दुराभिमानी, इथे न उद्रेकतो त्सुनामी
सरोवराची प्रसन्नता पाझरत नवा काळ येत आहे
अता न ते गीतकार जे वाढवीत काळा तुझी प्रतिष्ठा
हनीपुढे घाबरून लुंगी धरत नवा काळ येत आहे
मुले न घेती घरात म्हणुनी कुठेतरी हिंडतो बिचारा
अनाथ बापास आपल्या विस्मरत नवा काळ येत आहे
नवीन वस्ती वसेल तिथल्या जुन्या कड्यांचे विचार ऐका
नवीन माळीण घडविण्याला परत नवा काळ येत आहे
कसेल त्याची भले न होवो, जगेल त्याची जमीन होवो
जिथे तिथे 'बेफिकीर' हा नांगरत नवा काळ येत आहे
प्रतिसाद
छान. लोचनातले मोती आवडले आणि
छान. लोचनातले मोती आवडले आणि नांगरणारा काळही.
chitra suMdar aahe!
chitra suMdar aahe!
काळ- सृजनशील आहे तरीही
काळ- सृजनशील आहे तरीही विपरीतही, प्रसन्नता पाझरवणारा , मोहरवणारा आणि त्याच वेळी कृतघ्न भयाकारीही - ही द्वैती रूपे चितारणारी वेगळी गझल.आवडली.
नवीन वस्ती वसेल तिथल्या......
नवीन वस्ती वसेल तिथल्या....... जीवास झोंबणारे अत्यंत कटू पण नवकालीन सत्य..
मतला, 'विस्मरत' आणि मक्ता हे
मतला, 'विस्मरत' आणि मक्ता हे सर्वात छान वाटले.
'नवा काळ येत आहे' ही रदीफही छान वाटली.
हम्म्म्म
हम्म्म्म