शब्दकोडे क्र. १

2014HDA_shabdkode_1.JPG
आडवे शब्द -
१) हे झालेलं बघायला आवडतं, पण दुसर्‍यांकडे
४) पण हे मात्र स्वतःचं झालेलं कोणालाच आवडत नाही
७) प्रकाश कमी-जास्त होण्यामुळे निर्माण होणारी स्थिती
९) निराकरण करणे
११) निघून जाणे
१२) हा नेहमी म्हणतो
१३) रामायणातील एक व्यक्तिरेखा
१४) वनस्पतींमधील नवनिर्माण प्रक्रियेतील एक टप्पा
१५) भारतीय तत्त्वज्ञान परंपरेतील एक महापुरुष
१८) एक महत्त्वाची संख्या
२०) 'अंगात वारं' असलेल्या व्यावसायिक स्त्रिया
२१) 'ही' असेल तर नको; 'हा असेल तर स्वीकारायला तयार
२२) याच्या जोडीला 'मग' असेल तर त्रास होतो
२३) परमेश्वर
२४) माणसाचा उभा, गाडीचा आडवा
२५) एक घालण्याची गोष्ट
२७) आहे फळ, पण माणसाचा स्वभाव
२८) हवा, वस्तू इत्यादींची एक विशेष स्थिती
२९) एक वादग्रस्त कादंबरी
३१) कंटाळून वाट पाहत राहणे
३२) एक लढवय्या जमात
उभे शब्द -
१) वालाचा एक प्रकार, पण माणूस असा नसावा
२) मंत्रमुग्ध करणे, प्रभावित करणे
३) हे उठतात पण लगेच तिथेच बसतात
४) शब्द देवून बसलेला
५) याची चाहूल सुद्धा नकोशी वाटते
६) ही मात्र उठते आणि पसरतेसुद्धा
८) माणूस असावा तर असा
१०) ध्वनी
१५) गोरापान
१६) एक धरून राहण्याची गोष्ट
१७) एखादी गोष्ट करण्यास अटकाव करणे
१९) जलप्रवासाचे एक साधन
२०) एक उपयुक्त कोंबडा
२४) दोर्‍याच्या सहय्याने हालचाल करणारे एक खेळणे
२५) खिडकी
२६) असा प्रसंग नको
२७) ही पेटवतात पण त्यावर शेकत नाहीत (कुणाला आवडत नाही)
२८) हा तळात बसतो
३०) नाही म्हणण्याची एक रीत



शब्दकोडे # १ उत्तर


- अनंत बेडेकर

related1: 

HDA2014_blackseparator.jpg

HDA2014_rangolee4.jpg

HDA2014_blackseparator.jpg
अ‍ॅड. अनंत यशवंत बेडेकर
HDA_14_Nirogee_Anant_Bedekar.jpg
अ‍ॅडव्होकेट अनंत बेडेकर हे मिरज व सांगली येथे गेल्या ३६ वर्षांपासून वकिली व्यवसाय करत आहेत. सामाजिक नेत्रोपचार, अंधत्व प्रतिबंध (नियंत्रण) व निवारण (उपचार), अंधांचे शिक्षण व पुनर्वसन या क्षेत्रांशी गेली २२ वर्षे त्यांचा संबंध असून त्या क्षेत्रांत ते काम करत आहेत.

HDA2014_blackseparator.jpg

प्रतिसाद

मस्त डोकेबाज आहे हे कोडं. :)

खरेच डोकेबाज. अजून डोकं बाजवतीये, आपलं खाजवतीये. :)