हेच खरे

काळजाशी फक्त त्यांनी जोडले नाते खरे
जे तुला जमले न, दु:खांना कसे जमले बरे?

मी तुझ्या डोळ्यांत आता वाळवंटे पाहतो
ते तुझ्या नजरेतले का आटले सारे झरे?

दूर तू गेलीस, जाताना जरा हसलीस तू
सांग कोणी हे सुखाचे कवडसे कैसे धरे?

ही अशी आमंत्रणे देतात का कोणी कधी?
शोधतो पत्ता, निशाणी, नाव अन् सारी घरे

मी पुसोनी स्वच्छ केले माणसांचे आरसे
तो मला दिसलेच माझ्या चेहर्‍यावरचे चरे...!

- मिलन टोपकर

2013_HDA-chehare.jpg

2013_HDA_footer_1.jpg

प्रतिसाद

गझल खूप आवडली . चित्रही अगदी सुरेख, समर्पक आहे .

ही अशी आमंत्रणे देतात का कोणी कधी?
शोधतो पत्ता, निशाणी, नाव अन् सारी घरे >>> हा सर्वात विशेष वाटला.

वा..

छान गझल! चित्र तर खूपच आवडले.

गुड वन . आवडली
काही शेर खूपच छान झाले

धन्यवाद भारती, भिडे साहेब, श्यामली, अभिजित आणि वैभव. असाच लोभ ठेवा.
दिवाळीच्या आणि नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.

गझल खूप आवडली . चित्रही अगदी सुरेख, समर्पक आहे >>+1

सुंदरच....

'चरे' फारच आवडले ....