क्षण



kshan_sinal_f.jpg क्षणात दिसते, क्षणात नसते
कसे क्षणाला, कुणी धरावे?
मोजमाप कसल्या अंकांचे
क्षणात क्षणही, विरून जावे
कसे क्षणाला...

तुझा नी माझा, बंध क्षणाचा
क्षणाचाच अवकाश तुटाया
नवे बंधही क्षणात सारे
किती पुरावे, किती उरावे
कसे क्षणाला...

क्षणा सोबती, श्वास नव्याने
श्वासासंगे क्षण वेचावे
कुणी दूरच्या क्षणी भेटण्या
क्षणी असावे, क्षणी नसावे
कसे क्षणाला...

क्षणा क्षणाचे धागे रंगीत
रेशीमगाठी होऊन जावे
कसे कळेना कुठले धागे
किती तुटावे, किती जुळावे
कसे क्षणाला...

-जाह्नवीके

प्रतिसाद

आवडली.

क्षणोक्षणी अधिकाधिक आवडत जाणारी कविता सुंदर सादर केली आहे.

छानै!

सगळ्यांना धन्यवाद! आणि दिवाळीच्या शुभेच्छा....

सादरीकरणातून अधिक उलगडणारी कविता. छानच.

<<कसे क्षणाला, कुणी धरावे?>>

छान संकल्पना आणी सादरीकरण.

पुन्हा पुन्हा ऐकायला भाग पाडणारी मनोवेधक रचना.

उत्कृष्ठ सादरीकरण.

छान... सादरीकरण मात्र थोडे अधिक चांगले करता आले असते.. विशेषतः शेवटच्या कडव्यात काव्य संपले या अनुशंगाने शब्द/आवाज्/वजन फेक हवी.

छान आहे :)

कविता खूप छान!

धन्यवाद....
खूपच दिवसांनी मायबोली उघडलं......

छान!