हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता

राजहंस सांगतो किर्तीच्या तुझ्या कथा
हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता ||धृ||

पाहिले तुला न मी तरीहि नित्य पाहते
लाजुनी मनोमनी उगिच धुंद राहते
ठाउका न मजसी जरी निषद देश कोणता||१||

दिवसरात्र ओढणी या मनास लागते
तुझीच जाहल्यापरी मी सदैव वागते
मैत्रिणीस सांगते तुझी अमोल योग्यता||२||

निमंत्रणाविना पुन्हा हंस येइ तो वनी
नादचित्र रेखीतो तुझेच मंद कूजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागुता||३||

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: