या सुखांनो या

या सुखांनो या
एकटी पथ चालले, दोघांस आता हात द्या, साथ द्या

विरहांतीचा एकांत व्हा, अधीर व्हा आलिंगने
गाली-ओठी व्हा सुखांनो भाववेडी चुंबने
हो‌उनी स्वर वेळूचे वार्‍यासवे दिनरात या, गात या

आमुच्या बागेत व्हा लडिवाळ तुम्ही पाखरे
शयनघरच्या या छताची व्हा रुपेरी झुंबरे
होऊ द्या घर नांदते तुम्हीच त्यांना घास द्या, हात द्या

अंगणी प्राजक्‍त व्हा, सौधावरी व्हा चांदणे
जोडप्याचे गूज जुईचे चिमुकल्यांचे रांगणे
यौवनी सहजीवनी, दोन्ही मनांचे गीत व्हा, प्रीत व्हा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: