उसवले धागे कसे कधी सैल झाली गांठ

उसवले धागे कसे कधी सैल झाली गाठ
पावलांना ही कळेना का हरवली वाट

का किनारे फितूर झाले वादळाला ऐनवेळी
कोणत्याही चाहुलीवीण का अशी स्वप्ने बुडाली
मागण्या आधार उरला एक ही ना काठ

सावली म्हटली तरीही भावना असती तिला
सोबतीची आस वेडी का अजून लागे मला
गुंतणे माझे सरेना तू फिरवली पाठ

वाटते आता हवे ते तुझे गंधाळणे
पोळलेल्या या जीवा दे जरासे चांदणे
सोसवेना चालणे हे एकटे उन्हात

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: