एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात

एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात

धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो
कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात

वने, माळराने, राई,
ठायी, ठायी केले स्नेही
तुझ्याविना नव्हते कोणी, आत अंतरात

फुलारून पंखे कोणी, तुझ्यापुढे नाचे रानी
तुझ्या मनगटी बसले कुणी भाग्यवंत

मुका बावरा, मी भोळा
पडेन का तुझिया डोळा ?
मलिनपणे कैसा येऊ, तुझ्या मंदिरात

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

शामली
माझ्या पत्नीला हे गाणे फार आवडते. ते संपुर्ण मिळावे म्हणुन तीने त्याची cassette पण आणली पण ते गाणे पुर्ण नव्हते. आज तुझ्या कडुन मिळाल्यावर आनंद झाला. तुझे शतशः आभार.

सुषमा / रवी