एक लाजरा न् साजरा मुखडा, चंद्रावानी खुलला गं
राजा मदन हसतोय कसा, की जीव माझा भुलला गं
ह्या एकांताचा तुला इशारा कळला गं
लाज आडवी येती मला, की जिव माझा भुलला गं
नको रानी नको लाजू, लाजंमदी नको भिजू
हितं नको तितं जाऊ, आडोशाला उबं र्हाऊ
का? ... बघत्यात !
रेशीम विळखा, घालुन सजना, नका हो कवळून धरू
लुकलुक डोळं, करुन भोळं, बगतंय फुलपाखरू
कसा मिळावा पुन्हा साजनी मोका असला गं
डोळं रोखून, थोडं वाकून, झुकू नका हो फुडं
गटर्गुम गटर्गुम करून कबूतर बघतंय माज्याकडं
लई दिसानं सखे, आज ह्यो धागा जुळला गं
बेजार झाले सोडा सजणा, शिरशिरी आली अंगा
मधाचा ठेवा लुटता लुटता, बघतोय चावट भुंगा
मनात राणी तुझ्या कशाचा झोका झुलला गं ?
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार: