गा रे कोकिळा गा
भूलोकीच्या गंधर्वा तू
अमृत संगीत गा
गा रे कोकिळा गा...
सप्तसूरांचा स्वर्ग उभारून
चराचरांना दे संजीवन
अक्षय फुलवित हे नंदनवन
पर्णफुलातून गा...
कुहू कुहू बोलत मधुर गायनी
मोहित होता सारी अवनी
कुसुम कोमला ही वनराणी
नाचत थयथय गा...
मन्मथ मनीचा इंद्रधनुला
शरपंचम तो धावून आला
प्रीत भेटता अनुरागाला
मीलन होऊन गा...
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार: