गळ्याची शपथ तुझी नाही पटली
Submitted by mbhure on शुक्र., 03/09/2012 - 23:25गळ्याची शपथ तुझी नाही पटली
म्हणुन म्हण सुटली
नाही लागली हळद
जाहला नाही साखरपुडा
नाही बांधला मणी
घातला नाही हिरवा चुडा
नजर रोखसी जुलमी मजवर
सांग सख्या ही रीत कुठली .१
नाही नेसले पिवळी साडी
नाही मुंडावळी
तुझ्या संगती सात पाऊले
नाही अजुन टाकली
धाक दाविसी फुका कशाचा
काय तुझी जनरित कुठली ..२
मंगल वाद्ये वाजतील अन्
मंगलाक्षता शिरावरी
"सावधान" अक्षरे ऐकुनी
धडक माझिया भरे उरी
अंतरपाटा खालुन चोरुन
बघशिल नवरी कशी नटली ...३