मानसीचा चित्रकार तो

मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो ॥ ध्रु ॥

भेट पहिली अपुली घडतां, निळी मोहिनी नयनीं हसतां
उडे पापणी किंचित ढळतां, गोड कपोली, रंग उषेचे भरतो ॥ १ ॥

मम स्पर्शाने तुझी मुग्धता, होत बोलकी तुला न कळतां
माझ्याविण ही तुझी चारुता, मावळतीचे सुर्यफूल ते करतो ॥ २ ॥

तुझ्यापरी तव प्रीतीसरिता, संगम देखुन मागे फिरतां
हंसरी संध्या रजनी होता, नक्षत्रांचा, निळा चांदवा धरतो ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

दिनेश, हे 'कन्यादान' मधलं गाणं आहे ना? तेव्हा ते चित्रपटगीत म्हणून न टाकता भावगीत प्रकारात का टाकले आहेस? आणि 'फिरता' मध्ये 'फ' खाली नुक्ता नको.

प्रिया, कन्यादान मधले का नक्की ?
त्याला तर हृदयनाथचेच संगीत होते.
आशाची, सखी ग मुरली मोहन मोही मना,
आणि पैठणी बिलगून म्हणते मला, हि दोन्ही गाणी त्यातली.
या गाण्याचा प्रसंग आठवत नाही !!

गोंधळ झाला माझा, मी म्हणतोय तो चित्रपट, धर्मकन्या, कन्यादान नव्हे.
सुधारले आता.