धुंद मधुमती रात रे

धुंद मधुमती रात रे, नाथ रे
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा, नाथ रे, नाथ रे ॥ ध्रु ॥

जललहरी या धीट धावती, हरिततटांचे ओठ चुंबिती
येई प्रियकरा, येई मंदिरा, अलि रमले कमलांत रे ॥ १ ॥

ये रे ये कां, मग दूर उभा, हि घटिकाही निसटुन जायची
फुलतील लाखो तारा, हि रात कधि कधि ना यायची
चषक सुधेचा ओठी लावुनि, कटीभवति धरी हात रे ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

ओळ नाही राहिलेली पण दुसर्‍या कडव्यात 'हि' र्‍हस्व नसून 'ही' असे हवे. आणि मूळ पुस्तकाप्रमाणे 'कटिभवती' आहे.