अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया
बालपाणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान

लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेऊनी पंचप्राण

सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण

हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दविले प्रभु भगवान

आले किती गेले किती संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी आम्ही झालो हैराण

धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

प्रतिसाद

मर्यादांचे कुंपण !!
मनपाखरू माझे,
तुझ्याकडे यायला उडे,
त्याचवेळी नेमके,
मर्यादांचे कुंपण पड़े !!
चल सख्या दूर जाऊ,
क्षितिजाच्या पलिकडे,
नसतील जिथे आपल्याभोवती,
मर्यादांचे कड़े !!
असेल केवळ निरभ्र आकाश,
आणि असेल शांततेचे कोडे,
पडतील तेव्हा अंगावरती,
चांदण्यांचे सडे !!
हात हाती घेउनी,
डोळ्यात डोळे घालू गडे,
आज करू या मोकळी,
आपल्या भावनांची कवाडे

जिवंत कोण? कुणालाच बातमी नाही
दिसे हरेक तरी.. सावली हमी नाही
किती धुवाल तुम्ही रक्त शेवटी अमुचे
पचेल खून असा रंग मोसमी नाही
जपून वेच, फुले ही जनावरांसाठी
अरे, वसंत असा येत नेहमी नाही!
अम्हास रोज तुझे शब्द सांगतो वारा
तुला कळेल.. तुझी शॄंखला घुमी नाही
धनुष्यबाण जरी शोधशोधतो आम्ही
कसे अरण्य! इथे एकही शमी नाही!
दिलास तूच मला तूच हा रिता पेला
नसेल थेंब, तरी धुंद ही कमी नाही!
विचारतेस कशी बावरुन ताऱ्यांना..
घरासमोर तुझ्या चांदण्यात मी नाही!