अं

अं

अंधारल्या मनाचा

अंधारल्या मनाचा मी आज दीप झालो
उजळून अंतराला अगदी समीप आलो
हरवून सर्व वाटा ज्याला दिशा स्मरेना
हातात घेऊनिया त्याचाच हात आलो
गर्तेत गर्त खाता झालो हवाल दिल
खचल्या अशा मनाला देईत धीर आलो
काळोख मिट्ट जेथे तेथे उदास राती
काळोखल्या क्षणात लावित ज्योत आलो
आकाश तारकांचे जेव्हा ढगी बुडून
जमवून काजव्यांना खुलवित रात्र आलो

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अंग अंग तव अनंग खुलवि मदन-मंजिरी

अंग अंग तव अनंग खुलवि मदन-मंजिरी
देवदूत याचितात सुखद-संग माधुरी

मंद मंद हसित-लसित
वदन प्रणयरंग सदन
रूपरंग बहर तुझा कहर करी अंतरी

तव यौवन रंगदार
चाल तुझी डौलदार
जादुभरे नैनबाण हरिति प्राण सुंदरी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान

दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया
बालपाणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान

लक्ष्मणा आली मुर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेऊनी पंचप्राण

सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण

हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दविले प्रभु भगवान

आले किती गेले किती संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी आम्ही झालो हैराण

धन्य तुझे रामराज्य धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अंगणी माझ्या मनाच्या

अंगणी माझ्या मनाच्या मोर नाचू लागले
दाटुनि आभाळ आले मेघ बरसू लागले
अशा चिंब ओल्या क्षणी
पुकारे तुझी साजणी

चांदीची ही थेंबफुले या माळुनि येती सरी
आणि मातीच्या गंधाने भरते सरसर घागरी
धुंद नाचते उन्मनी
पुकारे तुझी साजणी

(सा रे म प, रे म प नि सा
सा नि प म रे, नि रे सा)

गार वारा मनभरारा शिरशिरी देही उठे
हा असा पाऊस आणि मी तुला शोधु कुठे
खोड ही तुझी रे जुनी
पुकारे तुझी साजणी

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले

अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले
एकदा जे वाटले ते प्रेम आता आटले,
सखी प्रेम आता आटले

दूर सोनेरी सुखाचे पाहिले आभास मी तू
रंगले आभाळ पूर्वी, तेच आता फाटले
सखी प्रेम आता आटले, सखी प्रेम आता आटले

एकदा ज्यांतून मागे सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले ते स्नेह-तंतू आतले
सखी प्रेम आता आटले, सखी प्रेम आता आटले

शेवटी मंदावलेल्या वादळी वार्‍याप्रमाणे
राहणे झाले दीवाणे, गीत गाणे कोठले
ते गीत गाणे कोठले, सखी प्रेम आता आटले

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: