त्या स्वरांच्या गंधरेखा

त्या स्वरांच्या गंधरेखा रेखुनी ये तू पुन्हा
डंख प्राणातील माझ्या चेतवूनी जा पुन्हा॥धृ॥
हासर्‍या डोळ्यास गहिर्‍या आसवाचा हार दे
पापणीच्या रेशमाला जहर काळी धार दे
सोबतीला वर्षणार्‍या दाह त्या संवेदना॥१॥
घेऊनी नजरेतुनी ये आर्जवी फसवे धुके
चार हळवे बोल आणिक धुंद स्पर्शाची सुखे
मार देई संगतीला शापणारी वंचना॥२॥
सोहळा संमोहनाचा मग सुखाने मांड तू
जीव घेणा खेळ तो मर्जीप्रमाणे तोड तू
काळजावर कोरूनी जा रक्त मग्ना पदखुणा॥३॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: