कोकिळ कुहुकुहु बोले, तू माझा तुझि मी झाले ॥ धृ ॥
ऋतुराजा तुझि वासंती, तरुतळी इथे एकांती
कर कोमल देता हाती, चांदण्यात दिवसा न्हाले ॥ १ ॥
हिंदोळत डहाळीवरती, मोहरुन अपुली प्रीती
निर्झरांत टिपण्या मोती, पाखरु जिवाचे आले ॥ २ ॥
तू येता सखया जवळी, फुलवेल तरूला कवळी
मधुमरंद भरतो कमळी, पापणीत हसतां डोळे ॥ ३ ॥
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार:
प्रतिसाद
चित्रपट : कन्यादान
दिनेश, हे भावगीताच्या ऐवजी चित्रपटगीत म्हणून बदल करणार का? चित्रपटाचं नाव दिलंच आहे वर.