का रे दुरावा

का रे दुरावा,का रे अबोला
अपराध माझा, असा काय झाला

नीज येत नाही, मला एकटीला
कुणी ना विचारी,धरी हनुवटीला
मान वळविसी तु वेगळ्या दिशेला

तुझ्या वाचुन ही, रात जात नाही
जवळी जर ये, हळू बोल काही
हाथ चान्दन्यान्चा, घेई ऊशाला

रात जागवावी नाही, असे आज वाटे
त्रुप्त झोप यावी, पहाटे पहाटे
नको जागने हे, नको स्वप्नमाला

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कल्पवॄक्ष कन्येसाठी

कल्पवॄक्ष कन्येसाठी लावुनियां बाबा गेलां
वैभवाने बहरुन आला, याल का हो बघायाला ॥ ध्रु ॥

तुम्ही गेला आणिक तुमच्या, देवपण नांवा आले
सप्तस्वर्ग चालत येतां, थोरपण तुमचे कळले
गंगेकाठि घर हे अपुले, तीर्थक्षेत्र काशी झाले
तुम्हावीण शोभा नाही, वैभवाच्या देऊळाला ॥ १ ॥

सुर्य चंद्र तुमचे डोळे, दुरुनीच हो बघतात
कमी नाहिं आम्हा कांही, कृपादॄष्टीची बरसात
पाच बोटे अमृताची, पंचप्राण तुमचे त्यांत
पाठिवरी फिरवा हात, या हो बाबा एकच वेळां ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कोकिळ कुहुकुहु बोले

कोकिळ कुहुकुहु बोले, तू माझा तुझि मी झाले ॥ धृ ॥

ऋतुराजा तुझि वासंती, तरुतळी इथे एकांती
कर कोमल देता हाती, चांदण्यात दिवसा न्हाले ॥ १ ॥

हिंदोळत डहाळीवरती, मोहरुन अपुली प्रीती
निर्झरांत टिपण्या मोती, पाखरु जिवाचे आले ॥ २ ॥

तू येता सखया जवळी, फुलवेल तरूला कवळी
मधुमरंद भरतो कमळी, पापणीत हसतां डोळे ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कळा ज्या लागल्या जीवा

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या
कुणाला काय हो त्यांचे ? कुणाला काय सांगाव्या ? ॥ ध्रु ॥

उरी या हात ठेवोनी, उरीचा शूल का जाई
समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही ॥ १ ॥

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगत बंधू
हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू ॥ २ ॥

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चहुकडे दावा ॥ ३ ॥

नदी लंघोनि जे गेले, तयांची हाक ये कानी
इथे हे ओढिती मागे, मला बंधोनी पाशांनी ॥ ४ ॥

कशी साहू पुढे मागे, जिवाला ओढ जी लागे
तटातट काळजाचे हे, तुटाया लागती धागे ॥ ५ ॥

पुढे जाऊं ? वळूं मागे ? करूं मी काय रे देवा
खडे मारी कुणी, कोणी हसे, कोणी करे हेवा ॥ ६ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कशी काळनागिणी

कशी काळनागिणी, सखे गं वैरिण झाली नदी
प्राणविसावा पैलतिरावरि, अफाट वाहे मधि ॥ ध्रु ॥

सुखी मीन हे तरति न गणुनी लाटा कोट्यावधी
सुखी पाखरे गात चालली, पार वादळी सुधी ॥ १ ॥

पैलतटी न कां तॄण मी झाले, तुडविता तरी पदी
पैलतटी न का कदंब फुलले, करिता माळा कधी ॥ २ ॥

पापिण खिळले तीरा, विरह हा शस्त्रावीणॆ वधी
प्राणांचे घे मोल नाविका, लावि पार, ने अधी ॥ ३ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कोण येणार गं पाहुणे?

कोण येणार गं पाहुणे?
ताई मला सांग
ताई मला सांग, मला सांग, मला सांग
कोण येणार गं पाहुणे?

आज सकाळपासून गं
गेली ताईची घाई उडून
आरशासमोरी बसून, आहे बुवा ऐट
घाल बाई नवे दागिने

घाली झोकात वेणी फणी
नवीन कोरी साडी नेसुनी
ताई माझी जरी दिसे देखणी
गोरे गोरे पान तेही आहेत सुंदर म्हणे

नक्को सांगूस जा गं मला,
मीच मज्जा सांगते तुला
गोड गोड खाऊ मला देतील नवे मेहुणे

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कोकिळे जा दूर

कोकिळे जा दूर मी गाते इथे खंबावती
पंचमाचा सूर च्कूनी नूर बदलू पाहती॥धृ॥
यायचे आहे घराला आज माझे दैव
तीव्रतेने लाविला गंधार ऋषभ धैव
रागिणीचा या तयाला आवडू दे आरती॥१॥
लाविले मध्यम निषाद कोमलांगी मोहक
जाणिले तू हृद्य झाले आज मम वासंतिक
मूक राहुनी ऐक मधुरा सूर जे लोभावती॥२॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कंठात अंबराच्या

कंठात अंबराच्या झुलवीत मेघ आला
पवनाशी खेळ झाला आला पाऊस आला॥धृ॥
चैतन्यहीन धरणी ग्रीष्मातल्या उन्हाने
पाहून वाट वेडी आतुरल्या मनाने
बोले हळूच कानी प्राशून थेंब ओला॥१॥
अस्मान गर्जू लागे बिजली कडाड वाजे
एकात एक भवरे तालात फेर साजे
झाडे लवूनी वदती आनंद दाटलेला॥२॥
धरती तृषार्त न्हाली पहिल्या सरीत ओली
हिरव्या तृणांकुराचा शालू अपूर्व ल्याली
रेखूनी सप्तरंग पिवळी किनार त्याला॥३॥
धरतीस शांतावया आल्या दुधाळ धारा
पडल्या वरून तारा घेऊन रूप गारा
नवरूप यौवनाचे आले चराचराला॥४॥
तालात मोर नाचे फुलवून तो पिसारा

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

कां धरिला परदेस

कां धरिला परदेस, सजणा
कां धरिला परदेस ॥ ध्रु ॥

श्रावण वैरी बरसे झिरमिर
चैन पडेना जीवा क्षणभर
जाऊं कोठे राहू कैसी, घेऊ जोगिणवेष ॥ १ ॥

रंग न उरला गाली ओठी
झरती आसू काजळकाठी
शॄंगाराचा साज उतरला, मुक्त विखुरले केश ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: 

हासायाचे, आहे मला

कसें, कसें, हासायाचे, आहे मला
हांसतच वेड्या जिवा, थोपटीत थोपटीत
फुंकायाचा आहे दिवा ॥ १ ॥

हांसायाचे, कुठे, कुठे आणि केव्हां
कसे आणि कुणापास, इथे भोळ्या कळ्यांनाही
आंसवाचा येतो वास ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: