मागतें मन एक कांही

मागतें मन एक कांही, दैव दुसरे घडविते
उमलण्याआधीच कैसे, फुल पायी तुडविते ॥ ध्रु ॥

खेळ नियती खेळते की, पाप येते हे फळां
वाहणार्‍या या जळाला, कोण मार्गी अडविते ? ॥ १ ॥

ईश्वरेच्छा हीच किंवा, संचिताचा शाप हा
चंद्ररेखा प्रतिपदेची, कोण तिमिरीं बुडविते ? ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: