हा रुसवा सोड सखे

हा रुसवा सोड सखे,
पुरे हा बहाणा, सोड ना अबोला
झुरतो तुझ्याविणा, घडला काय गुन्हा
बनलो निशाणा, सोड ना अबोला ॥ ध्रु ॥

इष्काची दौलत उधळी, तुझा हा नखरा
मुखचंद्राभवती कितीक फिरती नजरा
फ़सवा राग तुझा, अलबेला नशीला
करी मदहोश मला
नुरले भान अता, जाहला जीव खुळा ॥ १ ॥

तूझे फ़ितूर डोळॆ गाती भलत्या गझला
मदनाने केले मुष्किल जगणॆ मजला
पाहुनी मस्त अदा, फुले अंगार असा
सावरुं तोल कसा
नको छळवाद अतां, झालो कुर्बान तुला ॥ २ ॥

गाण्याचे आद्याक्षर: 
गाण्याचा प्रकार: