नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु
मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ||
हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी
रातिचिये स्वप्नी आला कोवळा दिनेशु ||१||
पहाटली आशा नगरी डुले पताका गोपुरी
निजेतुनी जागा झाला राउळी रमेशु ||२||
चैत वार्याची वाहणी आली देहाची अंगणी
अंग मोहरुनी आले जसा का पलाशु ||३||
गाण्याचे आद्याक्षर:
गाण्याचा प्रकार: